advertisement

लँडिंगचा शेवटचा निर्णय कुणाचा? अजित पवार विमान अपघातात नवा ट्विस्ट, तपासाला वेग

Last Updated:

Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आता निर्णायक वळणावर आला आहे.

News18
News18
जितेंद्र जाधव बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आता निर्णायक वळणावर आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) आणि DGCA च्या पथकांनी आता आपला मोर्चा विमानाने लँडिंगसाठी केलेल्या दुसऱ्या प्रयत्नावर वळवला आहे. तपासातील हे नवे धागेदोरे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

तपासात चार पैलूंवर भर

सूत्रांच्या माहितीनुसार, तपास यंत्रणा प्रामुख्याने खालील चार गोष्टींवर भर देत आहेत. यातील पहिली गोष्ट म्हणजे दृश्यमानता. अपघाताच्या वेळी बारामती विमानतळ परिसरात दाट धुके होते. दृश्यमानता केवळ ८०० ते ३००० मीटर असतानाही वैमानिकाने लँडिंगचा निर्णय का घेतला?
दुसरी बाब म्हणजे वैमानिकाला लँडिंगसाठी 'क्लिअर कमांड' दिली गेली होती का, की सिस्टिममध्ये काही तांत्रिक गोंधळ झाला होता? तिसरी गोष्ट म्हणजे अप्रोच आणि लँडिंग दरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये किंवा नियंत्रण प्रणालीत अचानक काही बिघाड झाला होता का? चौथी गोष्ट म्हणजे दुसऱ्या प्रयत्नात विमानाचा लँडींग अँगल चुकला आणि ते धावपट्टीऐवजी बाजुला जाऊन कोसळलं का? हा निर्णय कुणाचा? या अनुषंगाने तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
advertisement
तपासात असे समोर आले आहे की, पहिल्या प्रयत्नात दृश्यमानता कमी असल्याने वैमानिकाने 'गो-अराउंड' करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी दिसत नसतानाही लँडिंग करण्याचा धोका का पत्करण्यात आला, विमान लँडिंग करण्याचा शेवटचा निर्णय कुणी घेतला? वैमानिकाने घेतला की त्यांना तशी कमांड देण्यात आली? या अनुषंगाने तपास केला जात आहे.
advertisement

ब्लॅक बॉक्स आणि सीआयडी चौकशी

विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' सध्या दिल्लीतील प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आला असून, त्यातील डेटा लवकरच समोर येईल. दुसरीकडे, महाराष्ट्र CID ने देखील या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची ४ तास चौकशी करण्यात आली आहे. या दौऱ्याचे नियोजन आणि विमानाची निवड कोणी केली, याचा तपास सध्या सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लँडिंगचा शेवटचा निर्णय कुणाचा? अजित पवार विमान अपघातात नवा ट्विस्ट, तपासाला वेग
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement