TRENDING:

नोकरी मागायला गेला अन् बॅग विसरला, आमदाराच्या केबिनमध्ये बंदूक कुणी ठेवली? अखेर तो समोर

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात पिस्तूल असलेली एक बाग सापडल्याने गोंधळ उडाला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्याकडे एक तरुण नोकरी मागायला गेला आणि त्यांच्या कार्यालयातच एअरगन असलेली बॅग विसरला, हे पोलिसांच्या चौकशीनंतर समोर आले. याच घटनेची काल संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली.
संजय केनेकर
संजय केनेकर
advertisement

काल दुपारी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात पिस्तूल असलेली एक बाग सापडल्याने गोंधळ उडाला होता. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कंत्राटी नोकरीसाठी भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात शिफारसपत्र मागायला गेलेला तरुण बॅगसह त्यातील एअरगनही तेथेच विसरला. शनिवारी केणेकर यांचे सहकारी कार्यालयात गेल्यानंतर पिस्तूल पाहताच एकच हलकल्लोळ उडाला.

पोलिसांच्या तपासणीत ती एअरगन असल्याचे समोर आले. त्यानंतर क्रांतीचौक पोलिसांनी रितेश संतोष होळकर याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. रितेश बीएस्सीच्या तृतीय वर्षात आहे. काही दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. महानगरपालिकेत कंत्राटी नोकरी मिळवण्यासाठी त्याला एकाने केणेकर यांचे शिफारसपत्र घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. तो शुक्रवारी सायंकाळी तेथे गेला. सहा महिन्यांपूर्वी त्याने ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून एअरगन हौस म्हणून खरेदी केली होती. क्रांती चौक पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

advertisement

प्रकरण नेमके काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शनिपीडा, राहू-केतू दोष, शांतीसाठी शिवआराधना का मानली जाते प्रभावी? Video
सर्व पहा

भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एअर गन आढळून आल्याने खळबळ उडाली होती. रात्री भेटीसाठी आलेल्या एका व्यक्तीची बॅग कार्यालयातच विसरली गेली होती. त्या बॅगेत एअर गन सापडली. या घटनेनंतर आमदार केनेकर यांच्या घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. भेटीसाठी आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत बंदूक आढळल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांच्या तपासात घटनेचे सत्य समोर आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नोकरी मागायला गेला अन् बॅग विसरला, आमदाराच्या केबिनमध्ये बंदूक कुणी ठेवली? अखेर तो समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल