TRENDING:

गावची लोकसंख्या साडेचार हजार, ४ महिन्यात साडेतीन हजार जन्माच्या नोंदी, राज्यात खळबळ

Last Updated:

जन्म-मृत्यू नोंदीच्या पोर्टलचा पासवर्ड थेट बिहारमधून 'हॅक' करून हा उपद्व्याप केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात परप्रांतियांच्या ३ हजार ४४८ बोगस जन्मनोंदी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गावची लोकसंख्या साडेचार हजार आणि तेथे चार महिन्यांच्या काळात तब्बल साडेतीन हजार जन्माच्या नोंदी झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात उघडकीस आला आहे.
सोयगाव - बोगस जन्मनोंदी
सोयगाव - बोगस जन्मनोंदी
advertisement

विशेष म्हणजे, जन्म-मृत्यू नोंदीच्या पोर्टलचा पासवर्ड थेट बिहारमधून 'हॅक' करून हा उपद्व्याप केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. राज्याच्या आरोग्यविषयक माहिती आणि जन्म-मृत्यू विभागाच्या संचालकांच्या आदेशानुसार या नोंदी रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेल्या वर्षभरात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी नागरिकांनी संभाजीनगर जिल्ह्यात जन्म-मृत्यूंच्या बोगस नोंदी केल्या आहेत, त्याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. आता या प्रकारामुळे किरीट सोमय्या यांच्या दाव्याला पुष्टी मिळाल्याचे बोलले जात आहे.

advertisement

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात मोहळाई ग्रुप ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत मोहळाई आणि पिंप्री अंतुर ही दोन गावे येतात. या ग्रामपंचायतीचे मुख्यालय मोहळाई येथे आहे. त्या ग्रामपंचायतीच्या सीआरएस पोर्टलच्या युजर आयडीद्वारे मौजे पिंप्री अंतुर या गावात १ एप्रिल २०२५ ते २ ऑगस्ट २०२५ पर्यंत जन्माच्या ३ हजार ४४८ आणि मृत्यूच्या आठ नोंदी झाल्या आहेत का? याची चौकशी ग्रामसेवक तुळशीदास गोसावी यांनी संगणक परिचालकाकडे केली. तेव्हा त्यांनी संबंधित यूजर आयडी वापरात नसल्याचे सांगितले. मग इतक्या नोंदी कशा काय झाल्या? हा प्रश्न पडल्याने चौकशी केल्यानंतर हे उघडकीस आले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भगवान शिवाशी जोडणारा रुद्राक्ष, कसा करावा खरेदी, काय आहे महत्त्व, Video
सर्व पहा

त्यानंतर जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालयातील सांख्यिकी अधिकाऱ्याकडून या घटनेतील तथ्य शोधले असता, त्या युजर आयडीचा पासवर्ड बिहार येथील व्यक्तीने 'हॅक' करून हे कृत्य केल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर ही बाब तत्काळ राज्याच्या आरोग्यविषयक माहिती आणि जन्म-मृत्यू विभागाच्या संचालकांना कळविली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करा आणि सदरील नोंदी रद्द करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. त्यानुसार सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गावची लोकसंख्या साडेचार हजार, ४ महिन्यात साडेतीन हजार जन्माच्या नोंदी, राज्यात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल