कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया 17 सप्टेंबरआधी सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकारी विरोधी भूमिका जाहीर करावी लागेल, असा अल्टिमेटम पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी दिलाय. हैदराबाद गॅझेटवरून नोंदी द्यायला सुरूवात करा अन्यथा मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा जरांगेंनी दिलाय. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जालन्यात जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. जरांगे पाटलांनी नारायण गडावर जाऊन दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मराठवाडा शंभर टक्के आरक्षण जातोय, असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले.
advertisement
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
सोमवारी दुपारच्या सुमारास मनोज जरांगे पाटलांचं आंतरवाली सराटीत आगमन झालं. त्यावेळी आंतरवाली सराटीतल्या गावकऱ्यांनी जरांगेंचं जल्लोषात स्वागत केलं. दरम्यान, हैदराबाद गॅझेटमुळे आपली नोंद झाली असून, मराठवाड्यातील शंभर टक्के मराठ्यांना ओबीसीत घ्यावच लागेल नाही तर महाराष्ट्र बंद करू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. हैदराबाद गॅझेटमधील नोंदीच्या आधारे दाखले द्या, मराठवाडा १०० टक्के आरक्षण जातोय, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले?
मराठवाड्याचे सर्व रेकॉर्ड हैदराबाद गॅझेटमध्ये होते. म्हणून हैदराबाद गॅझेट लागू करून ज्यांची नोंद असेल त्याला जातीचे दाखले मिळतील, असा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. त्यावर ज्यांच्या नोंदी नसतील त्यांना दाखले मिळणार नाहीत, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे सरसकट दाखले मिळणार हा जरांगे पाटील यांचे म्हणणे फडणवीस यांनी खोडून काढले.