महाराष्ट्रात करमणूक करच नाही - देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, वीरता आणि विद्धवता प्रचंड होती. पण इतिहासाने त्यांच्यावर नेहमी अन्याय केला. मात्र, त्यांच्यावर खूप चांगला सिनेमा आला आहे. या ऐतिहासिक सिनेमाला करमुक्त करण्याची मागणी होताना दिसतीये. परंतू एक लक्षात घ्या की, महाराष्ट्रात करमणूक करच नाहीये. परंतु महाराष्ट्राने 2017 सालीच करमणूक कर नेहमीसाठी रद्द केला होता. त्यामुळे आपल्याकडे करमणूक करच नसल्याने करमुक्त करण्याचा विषयच येत नाही. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वत्र पोहोचवण्यासाठी आपण काय करू शकतो, यावर आम्ही प्रयत्न करू, असं आश्वासन देखील फडणवीसांनी दिलं आहे.
advertisement
टॅक्स फ्री करण्याची मागणी
राज्य सरकारने छावा चित्रपट करायला हवा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत हिंदी चित्रपट 'छावा' करमुक्त करण्याबाबत मराठा सेवा संघ, छावा संघटना तर्फे पारोळा तहसीलदार अनिल पाटील यांना निवेदन दिलं होतं.
छावा सिनेमाची कमाई किती?
दरम्यान, 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात 33.1 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. दुसऱ्या दिवशी 39.3 कोटी, तिसऱ्या दिवशी 49.03 कोटी आणि चौथ्या दिवशी 24.1 कोटी अशी या चित्रपटाची कमाई वाढतच गेली. पाचव्या दिवशी संध्याकाळपर्यंत या चित्रपटाने 8.57 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे पाच दिवसांत ‘छावा’ चित्रपटाचे एकूण कलेक्शन 154.1 कोटी रुपये झाले आहे. यासह चित्रपटाने 150 कोटींचा गल्ला पार केला आहे.