यावेळी त्यांनी माझी आणि मनोज जरांगे यांची ब्रेन मॅपिंग टेस्ट करावी, यासाठी मी स्वत: कोर्टात जाऊन परवानगी घेऊन येतो, असंही धनंजय मुंडे म्हणाले. केवळ मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू नये, अशी माझी मागणी आहे, यामुळे ते मला टार्गेट करत आहेत, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे. यावेळी मुंडे यांनी आरोपींनी केलेल्या कथित फोनवर देखील भाष्य केलं.
advertisement
धनंजय मुंडे नक्की काय म्हणाले?
"माझ्याकडे एकमेव फोन आहे. जो २४ तास सुरू असतो. मी तो चालू का ठेवतो? कारण माझ्या आजुबाजुला माझ्यावर ज्यांचा सगळ्यात जास्त विश्वास आहे. त्यांना कुठलीही अडचण आली तर ते आधी मला फोन लावतात. त्यांची कसलीही अडचण होऊ नये म्हणून मी माझा फोन सुरू ठेवतो. त्यांच्या अडचणी सोडवतो. अशात कुणी मला फोन केला आणि बोलले असतील तर याचा अर्थ मी त्यांना संपवण्याबाबत बोललो का? हे सगळं कशासाठी सुरू आहे ?, असा सवालही धनंजय मुंडेंनी विचारला.
"या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी महागात पडणार... कर्मा रिपीट्स.... जेवढं तुम्ही खोटं कराल, तेवढं खोटं तुमच्या विरोधात देखील फिरेल... एवढं लक्षात ठेवा, असा इशारा धनंजय मुंडे दिला. शिवाय अटक केलेले आरोपी हे जरांगे यांचेच कार्यकर्ते आहेत. तक्रार करणारे आणि आरोप करणारे, देखील सर्वच जण जरांगेंच्या जवळचे आहेत, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
