Dharashiv ZP- Panchayat Samiti election Result Live: धाराशिव जिल्हा परिषदेची पंचायत समितीची मतमोजणी अवघ्या काही तासात सुरू होणार असून आज मिनी मंत्रालयाची कारभारी निवडले जाणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात तालुक्यात हिम्मत मोजणी होणार आहे. 55 जिल्हा परिषद व 110 पंचायत समिती गण यासाठी निवडणूक या झाल्या असून त्याची मतमोजणी आज पार पडणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून तालुक्यातील सर्वच ठिकाणी हि मतमोजणी केली जाणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनही आपली तयारी पूर्ण केली असून मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.