एबीपी माझाच्या माझा व्हिजन या कार्यक्रमात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाची कबर हटविण्याचा मुद्दा, अबू आझमी यांचे औरंगजेबावरील वादग्रस्त वक्तव्य, सध्याचे हिंदू मुस्लिम राजकारण, नागपूरची दंगल तसेच छावा चित्रपट अशा विविध विषयावर आपली मते मांडली.
छावा सिनेमावर इम्तियाज जलील यांचा आक्षेप
छावा चित्रपटाविषयी आपल्याला काय वाटते असे विचारले असता, चित्रपट बनवायचा होता तर 'दिलवाले दुल्हनिया' किंवा आमिर खानसारखा 'थ्री इडियट्स' बनवायचा होता. लोकांनी मनोजंरनात्मक चित्रपट पाहिला असता. पण तुम्ही सिनेमातून ४०० वर्षांपूर्वीची क्रूरता दाखवली. अजूनपर्यंत तरी मी सिनेमा पाहिलेला नाही. परंतु लाडकी बहीण योजनेचा वाढीव हफ्ता, शेतकऱ्यांची कर्जमाफी असे विविध विषय महत्त्वाचे असताना सगळे मंत्री आमदार चित्रपट पाहायला गेले. त्याचे कारण हा चित्रपट त्यांना राजकीय फायदा देणारा होता.
advertisement
देशात जे वाईट झालंय ते सगळंच दाखवा की....
याच न्यायाने गुजरात दंगलीवर एका वृत्तसमूहाने डॉक्युमेंटरी (माहितीपट) तयार केला होता, ज्यावर सत्ताधाऱ्यांनी बंदी आणली गेली. का बरं? ती पण लोकांना पाहू द्यात की... देशात जे वाईट झालंय ते सगळं दाखवा आणि लोकांना बघण्याचा अधिकार द्या, असे रोखठोक मत जलील यांनी व्यक्त केले.
छावा प्रपोगंडा चित्रपट आहे असे आपल्याला वाटते का? इम्तियाज जलील म्हणाले...
द केरला स्टोरी, काश्मिर फाईल्स असे चित्रपट प्रपोगंडा असल्याची टीका झाली, छावाही प्रपोगंडा चित्रपट आहे असे आपल्याला वाटते का? या प्रश्नावर जलील म्हणाले, " छावा बघितल्यानंतर लोकांच्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहून मला खंत वाटते. दुख इस बात का नही की धर्म का धंदा चल रहा है... दुख इस बात का है इस धर्म के धंदे मे पढा लिखा भी अंधा हो रहा है... ४०० वर्षांपूर्वीच्या औरंगजेबाच्या क्रूरतेविषयी लोक इम्तिजाय जलीलकडे हिशेब मागत आहेत. पण कोणत्याही मुघलांसोबत मुस्लिम नाते सांगणार नाही. किंबहुना औरंगजेबाचे पोस्टर जाळल्यानंतर कोणत्याही मुस्लिमांनी विरोध केला नाही."