जालना : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे गेल्या काही दिवासांपासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे एकमेकांवर थेट टीका करताना दिसत आहेत. मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला असा आरोप मनोज जरांगे यांनी केल्यानंतर या दोन्ही नेत्यांत उघड संघर्ष पाहायला मिळाला. आता मनोज जरांगेंनी त्यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण काढण्यात यावे अशी मागणी सरकारकडे केली आहे.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आमदार धनंजय मुंडे यांना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी कला आहे. त्यामुळे स्वतःचे पोलीस संरक्षण नाकारत, आपले संरक्षण काढण्यात यावे अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. आज जालन्यात पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्याकडे मनोज जरंगे यांचे सहकारी किशोर मरकड यांनी अर्जाद्वारे ही विनंती केली आहे.
नेमकं काय म्हटलंय अर्ज?
जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आपला घातपात करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला होता. दरम्यान, पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जात मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. माझ्या घातपाताचा कट रचणारा धनंजय मुंडेच आहे. या कटाच्या मुख्य सूत्रधाराला सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून वाचवत आहे, असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे.
मला पोलीस संरक्षण नको मला दिलेलं पोलीस संरक्षण तात्काळ काढावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पोलीस अधीक्षकांना अर्ज दिला आहे.
आतापर्यंत काय काय घडलं?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनजंय मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मनोज जरांगे पाटलांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केलाय. धनंजय मुंडेंनी मला मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली, असा गंभीर आरोप जरांगेंनी केला. बीडमधून अमोल खुणे आणि दादा गरुड या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता जरांगेंनी या प्रकरणात धक्कादायक आरोप केले मात्र मुंडेंनी हे आरोप फेटाळून लावलेत.जरांगेंच्या सनसनाटी आरोपांनंतर धनंजय मुंडे आक्रमक झालेत.. याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचं आवाहन मुंडेंनी केलीय. तसेच पली आणि जरांगेची ब्रेनमॅपिंग, नार्को टेस्ट करा असं आव्हान मुंडेंनी केलेलं हे आव्हान जरांगेंनी स्वीकारलं आहे.
