राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसंच राज ठाकरे आणि भाजपमध्ये काय चर्चा झाली यावर माहिती दिली. 'आमच्यामध्ये काहीही चर्चा झालेली नाही, पण वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. मी दक्षिण मुंबईमधूनच दोन वेळा लोकसभा लढवली होती. आताही साहेब मला म्हणाले की तुला गडचिरोलीला जाऊन लढवायचं आहे, तर मी गडचिरोलीला जाऊन उभा राहिन, कारण वर्षानुवर्ष आदेश ऐकण्याची सवय झाली आहे, त्यामुळे आम्ही आदेश ऐकतो आणि पुढची वाटचाल करतो', असं बाळा नांदगावकर म्हणाले.
advertisement
'दिल्लीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं राज ठाकरेंनी आम्हाला सांगितलं, लवकरच निर्णय होईल. ज्या मागण्या केल्या आहेत, त्यावर फलदयी चर्चा झाली आहे. कुणाला तिकीट द्यायचं याचा निर्णय पक्ष घेईल. आता राज्य स्तरावर चर्चा होईल', अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
दरम्यान 21 मार्चला राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज ठाकरे मनसेच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत. अमित शाह यांच्या भेटीबाबत राज ठाकरे मनसेच्या नेत्यांना माहिती देणार आहेत.