या निवडणुकीत पक्षापेक्षा व्यक्ती, विकासापेक्षा धनशक्ती आणि जातीय समीकरणे निर्णायक ठरत असल्याचे चित्र आहे. निष्ठावंत उमेदवार ऐनवेळी पक्ष बदलून रिंगणात उतरल्याने संपूर्ण राजकीय गणित ढवळून निघाले आहे.
कन्नडमध्ये जिल्हा परिषद गटात कशी लढत?
नागद गट: चौरंगी लढत; राजपूत, राठोड, काँग्रेस-भाजप-राष्ट्रवादी समर्थित उमेदवार आमनेसामने
चिंचोली गट: भाजप × शिवसेना × उबाठा × राष्ट्रवादी × विकास आघाडी – बहुरंगी संघर्ष
advertisement
पिशोर गट: सामाजिक समीकरणे व मुस्लिम मतदार निर्णायक
कुंजखेडा गट: भाजप × राष्ट्रवादी × उबाठा × काँग्रेस – थेट चौरंगी
हतनूर गट: माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची मुलगी मीनाक्षी पवार केंद्रस्थानी
करंजखेडा गट: माजी आमदार पुत्र विरुद्ध माजी जि. प. सदस्य – हायव्होल्टेज सामना
जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारात माजी मंत्री बबनराव लोणीकर चार दिवस हतनूरमध्ये तळ ठोकून होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, अंबादास दानवे यांच्या सभांनी वातावरण तापलं. गावोगावी सभा, बैठका, घरभेटी आणि पैशाच्या ताकदीचा मोठा वापर झाला.
नातेगोते, स्थानिक-बाहेरचा उमेदवार आणि जातीय गणिते हेच प्रचाराचे मुख्य मुद्दे राहिले.
