TRENDING:

Malegaon Girl Murder Case: मालेगाव चिमुरडी हत्या प्रकरणी पोलिसांची अनेकांवर कारवाई, गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट

Last Updated:

'आरोपीला फाशी द्या', अशी मागणी जमावाची होती. आता मालेगावच्या छावणी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी धुडगूस घालणाऱ्या जमावा विरुद्ध

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मालेगाव : मालेगावमधील डोंगराळे गावातील ३ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. आरोपी विजय खैरनारला अटक केली असली तरी जनक्षोभ काही कमी झाला नाही. अशात मालेगाव न्यायालयात शेकडो गावकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. आता या प्रकरणी पोलिसांनी शेकडो आंदोलकांवरच गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे मालेगावमध्ये पोलिसांच्या कृत्यावर संताप व्यक्त केला जात आहे.
News18
News18
advertisement

डोंगराळे येथील बालिका अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी मालेगावमध्ये शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला होता. मोठ्या संख्येनं स्थानिक आणि गावकरी या मोर्चामध्ये सामील झाले होते. या मोर्चानंतर संतप्त जमावाने मालेगाव अप्पर न्यायालयात धडक दिली. यावेळी संतप्त जमावाने न्यायालयाचं गेट तोडून आता शिरून जोरदार धुडगूस आणि गोंधळ घातला होता.

advertisement

'आरोपीला फाशी द्या', अशी मागणी जमावाची होती. आता मालेगावच्या छावणी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी धुडगूस घालणाऱ्या जमावा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी आरोपा खाली वेगवेगळ्या कलमाखाली छावणी पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पोलिसांनी का केले गुन्हे दाखल?

advertisement

मालेगाव पोलिसांनी जमावाविरोधात गुन्हे दाखल केले आहे.  आदेशाचे उल्लंघन  आणि सार्वजनिक मालमत्ता हानी आणि दंगा घालणे ही कारणं दाखवली आहे.  CCTNS, 313/2025 BNS 2023 चे कलम 189(2), 190, 191(2), 324(4), 132, 195 सह सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम 1984 चे कलम 3 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियस अधि. 1951 चे कलम 37 (1), (3) चे आदेशाचे उल्लंघन केले म्हणून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे. ही घटना २१ नोव्हेंबर रोजी  सकाळी 11.00 ते दुपारी 14.00 वाजेदरम्यान मालेगाव न्यायालयाच्या गेट जवळ झाली होती. या प्रकरणी छावणी पोलीस  ठाण्याते पोलीस हवालदार  किशोर पद्माकर साळवे यांनी फिर्याद दिली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात कमी पाणी पिताय? वेळीच व्हा सावध, नाहीतर हे आजार नाही सोडणार साथ
सर्व पहा

जनआक्रोश मोर्चातील काही उपद्रवी अंदाजे 100 से 150 पेक्षा जास्त अनोळखी आरोपी आहे. या प्रकरणात कुणालाही अटक केली नाही.  घटनेच्या वेळी आणि ठिकाणी यातील जनआक्रोश मोर्चातील काही उपद्रवी अंदाजे 100 ते 150 पेक्षा जास्त अनोळखी आरोपी यांनी मा.अपर जिल्हादंडाधिकारी सो यांचे जमावबंदीचे आदेश क्र 1/ पीओएल/1/3672/2025 दिनांक 15/11/2025 अन्वये नाशिक ग्रामीण घटकात दिनांक 15.11.2025 ते 30.11.2025 रोजी संपूर्ण नाशिक जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 वे कलम 37 (1), (3) अन्वये लागू असताना जनआक्रोश मोर्चातील काही उपद्रवी अंदाजे 100 ते 150 पेक्षा जास्त अनोळखी इसमांनी गैरकायद्याची मंडळी जमवून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं आणि सार्वजनिक शांतता धोक्यात आणतील, असं कृत्य केलं आणि सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Malegaon Girl Murder Case: मालेगाव चिमुरडी हत्या प्रकरणी पोलिसांची अनेकांवर कारवाई, गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल