TRENDING:

मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, घडामोडींना वेग; सुरेश धस बीडहून थेट अंतरवालीत

Last Updated:

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनजंय मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना :  मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येची सुपारी दिल्याच्या बातमीनं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. आता ती कोणी दिली याचा खुलासा जरांगेंनी केलाय. माजी मंत्री धनंजय मुंडेंवर त्यांनी हा गंभीर आरोप केलाय. त्याला धनंजय मुंडेंनीही उत्तर देत दोघांचीही नार्को टेस्ट करा आणि प्रकरणाची सीबीआय चौकशी करा असं खुलं आव्हान दिलंय. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांची अक्षरश राळ उठलीय. दरम्यान अंतरवालीत मोठ्या घडामोडी होत असून भाजप आमदार सुरेश धस जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवालीमध्ये दाखल झाले आहे.
News18
News18
advertisement

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनजंय मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.  मनोज जरांगे पाटलांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केलाय. धनंजय मुंडेंनी मला मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली, असा गंभीर आरोप जरांगेंनी केला. बीडमधून अमोल खुणे आणि दादा गरुड या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता जरांगेंनी या प्रकरणात धक्कादायक आरोप केले मात्र मुंडेंनी हे आरोप फेटाळून लावलेत.

advertisement

सुरेश धस आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा

जरांगेंच्या भेटीसाठी आमदार नारायण कुचे हे देखील आले. त्यापाठोपाठ आता सुरेश धस जारांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले. सुरेश धस आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा सुरु असून आपल्याला जीवे मारण्याच्या कट उघड झाल्या नंतर त्या सगळ्या गोष्टी संदर्भात जरांगे पाटील संवादच्या माध्यमातून धस यांना माहिती दिली.

advertisement

जरांगेंच्या सनसनाटी आरोपांनंतर धनंजय मुंडे आक्रमक

जरांगेंच्या सनसनाटी आरोपांनंतर धनंजय मुंडे आक्रमक झालेत.. याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचं आवाहन मुंडेंनी केलीय. हा कट रचण्यासाठी आरोपींची धनंजय मुंडेंसोबत बैठक झाल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय, त्यालाही धनंजय मुंडेंनी उत्तर दिलंय. जरांगेंविरोधात कट रचणाऱ्या आरोपी दादा गरडचा कबुली देतानाचा व्हिडिओही समोर आलाय.. आपली आणि जरांगेची ब्रेनमॅपिंग, नार्को टेस्ट करा असं आव्हान मुंडेंनी केलेलं हे आव्हान जरांगेंनी स्वीकारलं आहे.

advertisement

जरांगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे वादाचा  नवा अंक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोयाबीनच्या दराबद्दल नवी अपडेट, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि धनजय मुंडेंमध्ये जुंपली आहे. ओबीसी मेळाव्यातून धनंजय मुंडेंनी जरांगेंवर टीका केलेली..त्यावर जरांगेंनी पलटवार केला आहे. यातच आता जरांगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे वादाचा हा नवा अंक सुरु झाला आहे.  आता या प्रकरणाच्या चौकशीतून नेमकं सत्य समोर येणार आहे....

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, घडामोडींना वेग; सुरेश धस बीडहून थेट अंतरवालीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल