जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ल्याचा कट समोर आला. या प्रकरणी जरांगेंनी थेट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला आहे. पण, आता पुन्हा एकदा जरांगेंनी धनंजय मुंडे यांची ऑडिओ क्लिपचा ऐकवली आहे. या क्लिपमध्ये आरोपींनी धनंजय मुंडे दोन कोटी रुपये देतो म्हणाले असं दोघांचं संभाषण आहे.
advertisement
मनोज जरांगेंनी आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळून लावले. त्यानंतर पुन्हाा मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंची पोलखोल केली आहे. यावेळी पुरावा म्हणून जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिप ऐकवली.
'हा साधा सुद्धा चेष्टावर न्यायचा विषय नाही. जी घटना करायला नको होती, पण त्याने केली. परिस्थिती मर्यादेपलीकडे त्याने नेली. मला जी माहिती मिळाली ती पोलिसांना सांगितली, त्याची चौकशी करा, अशी मागणी केली आहे. यात चौकशी नको का व्हायला. सगळ्यात आधी मी नार्को टेस्ट करण्यासाठी कोर्टात अर्ज करणार आहे. मी जातवान आहे, धनंजय मुंडे मी तुझ्यासारखा नाही मी. तुम्ही सीबीआय काय म्हणताय, त्याच्या वरची करा, मी तयार आहे, असं आव्हानचं जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिलं,
'
'तुम्ही चुकीच्या ठिकाणी हात घातला म्हणून पकडला गेला असं म्हणत जरांगेंनी पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवली. अटक केलेल्या दोन आरोपींची एकमेकांत पैशांची डिल, कधी पैसे मिळणार याची ऑडिओ क्लिप सगळ्यांना ऐकवली. या क्लिपमध्ये आरोपी अमोल खुणे आणि दादा गरुड याच्यात झालेलं संभाषण आहे. धनंजय मुंडे दोन कोटी रुपये देतो म्हणाले, असं दोघांचं संभाषण आहे. हे दोघे गोळ्या आणणार होते आणि जेवणात देणार होते. किंवा गाडी ताफ्यात घालून अंगावर घालायची असा दोघांचा संवाद आहे, अशी क्लिपच जरांगंनी ऐकवली.
मुख्यमंत्र्यांनी यांचे सीडीआर घ्यायला पाहिजे. हा आरक्षणाचा विषयच नाहीये इथं जिवणाचा प्रश्न आहे. धनंजय मुंडे आणि आरोपींची क्लिप ऐकवली. आरोपीने धनंजय मुंडे यांच्याकडे गाडीची मागणी केली. सीबीआय सीडीआर नार्को टेस्टसाठी मी तयार आहे. तुम्हीच घातपात घडून आणायचं ठरवलं होतं. काय गोष्टी आहेत तर ओपन होऊ द्या. धनंजय मुंडेंनी विषय डायव्हर्ट करायचा नाही इथे घातपाताचा विषय आहे. तुम्हाला काय कारवाई करायची तर करा, खुनाचा कट तू रचणार आणि कारवाई तू करणार, अजितदादा तुम्हाला असले विकृत लोक संपवायला लागणार, असंही जरांगे म्हणाले.
