मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, सुपारी देण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आहेत. कांचन नावाची व्यक्ती धनंजय मुंडे यांचा पीए अथवा निकटवर्तीय आहे. त्यानेच अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना सुपारी दिली असल्याचा आरोप जरांगे यांनी दिली.
धनजंय मुंडेंसोबत आरोपींची बैठक...
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, अटकेतील एका आरोपींने कांचनची भेट घेतली. कांचनने आरोपींना परळीला नेलं. तेव्हा रेस्ट हाऊसमध्ये एक मोठी बैठक सुरू होती. कांचन आला असल्याचे समजल्यानंतर धनंजय मुंडे यांनी बैठक अर्धवट सोडली. अवघ्या २० मिनिटांत त्यांना भेटायला आले. एक आरोपी तिथं आला होता, दुसरा आरोपी आधीपासूनच तिथं होता.
advertisement
जीवे मारण्याचा डाव...
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, आपल्याला मारण्यासाठी तीन प्रकारची योजना आखण्यात आली होती. आरोपींचे पहिलं काम ठरलं होतं. खोट्या रेकॉर्डिंग बनवा, व्हिडीओ बनवा, ते द्या. पण त्यांना खरे आणि खोटे कसलेच व्हिडीओ मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी हत्या करण्याचा कट आखला होता. मग गोळ्या देऊ... औषध देऊ... मग घातपात करू, असं ठरला असा गौप्यस्फोट जरांगे यांनी केला.
किती रुपयांची सुपारी...
आपल्याला जीवे मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी देण्यात आली होती, असा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला. आरोपींना दोन कोटींची सुपारी दिली. त्याशिवाय, अधिक ५० लाख रुपये देण्याचे ठरले. आरोपींनी कारची मागणी केली होती. त्यावर धनंजय मुंडे यांनी आपली एक जुनी गाडी आहे, ती वापरा असे सांगितले. ही गाडी इतर राज्यातील असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण करत असलेल्या वक्तव्यांना पुष्टी देणारे काही ऑडिओ रेकोर्डिंग असल्याचा आरोप केला. पंकजा मुंडे यांच्याबद्दलही आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
