TRENDING:

मुंबईचा काळा घोडा फेस्टिव्हल पुण्यानं गाजवला, इतिहासात 'हे' पहिल्यांदाच घडलं, पाहा काय केलं? Video

Last Updated:

Kala Ghoda Festival: काळा घोडा फेस्टिव्हलला अनेक वर्षांची परंपरा असून देशभरातील कलाकार येथे आपली कला सादर करण्यासाठी येतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: मुंबईतील काळा घोडा फेस्टिव्हल 2026 मध्ये चिल्ड्रन्स इन्स्टॉलेशन विभागातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक कन्या शाळा, थेरगाव या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे या प्रतिष्ठित स्पर्धेत पहिल्यांदाच महापालिकेच्या शाळेला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. याबाबतची माहिती शाळेच्या शिक्षिका मुक्ता पुसाळकर धोंगडे यांनी लोकल 18 सोबत बोलताना दिली आहे.
advertisement

मुक्ता पुसाळकर यांनी सांगितले की, “मुंबईतील काळा घोडा फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित चिल्ड्रन्स इन्स्टॉलेशन विभागात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चार शाळांची निवड करण्यात आली होती. आमच्या शाळेने मानवी विचारांचे रोलरकोस्टर या विषयावर सादरीकरण केले होते. या मॉडेलमध्ये अनेक टाकाऊ वस्तूंचा प्रभावी वापर करून मानवी मनाचा वेध, भावनांची गुंतागुंत आणि आत्मसंयम यांचे प्रतीकात्मक दर्शन घडवण्यात आले आहे. मानवी विचारांचा आणि भावनांचा सखोल उलगडा या मॉडेलमधून होत असल्याने आमच्या शाळेचे सादरीकरण विशेष लक्षवेधी ठरले.”

advertisement

12 लाख वर्षांपूर्वीच्या मानव संस्कृतीचे दुर्मिळ पुरावे, डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात अनोखा ठेवा, Video

इन्स्टॉलेशनची कलात्मक मांडणी

मानवी विचारांचे रोलरकोस्टर हे मॉडेल तयार करण्यासाठी शाळेने अनेक महिन्यांपासून मेहनत घेतली होती. या सादरीकरणात सायकलच्या चाकांमध्ये धावणारा घोडा मानवी विचारांचा वेग आणि इच्छाशक्ती दाखवतो, तर दोरी पकडून उभी असलेली मुलगी आत्मसंयम आणि विवेक दर्शवते. टाकाऊ वस्तूंमधून तयार केलेले चेहरे आणि मानवी आकृती जीवनातील संघर्ष आणि मानसिक चढ-उतार दाखवतात. विचारांवर नियंत्रण ठेवून योग्य दिशा घ्यावी, असा संदेश देणाऱ्या या इन्स्टॉलेशनमुळे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत बाजी मारली आहे. महानगरपालिकेच्या शाळेच्या प्रथम क्रमांक आल्यामुळे त्याच सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मैत्री, प्रेम आणि लग्न! पुणेकर समीर–अमित जिंकले पण...,संघर्ष कधी संपणार? Video
सर्व पहा

दरम्यान, मुंबईतील प्रतिष्ठित काळा घोडा फेस्टिव्हल 2026 हा 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत नुकताच पार पडला. या फेस्टिव्हलला अनेक वर्षांची परंपरा असून देशभरातील कलाकार येथे आपली कला सादर करण्यासाठी येतात. पूर्ण भारतातील विविध कलाकृतींची झलक या फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतील अनेक नामांकित व खासगी शाळांनी सहभाग नोंदवला होता.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
मुंबईचा काळा घोडा फेस्टिव्हल पुण्यानं गाजवला, इतिहासात 'हे' पहिल्यांदाच घडलं, पाहा काय केलं? Video
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल