advertisement

सत्तेचे काय कधी येते कधी जाते... स्टोरीला इमोशनल गाणं, पराभवानंतर निर्मला नवले यांची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

Nirmala Nawale: लोकांची साथ न लाभल्याने पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी निर्मला नवले यांना पराभवाचा धक्का बसला.

निर्मला नवले (पराभूत उमेदवार)
निर्मला नवले (पराभूत उमेदवार)
पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून राष्ट्रवादीच्या पदाधिकारी निर्मला नवले यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. भारतीय जनता पक्षाच्या मनीषा पाचंगे यांनी निर्मला नवले यांना पराभवाची धूळ चारली. समाज माध्यमांवर लाखो लोकांची पसंती असताना प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र नवले यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
युवा वर्गात असलेली त्यांची लोकप्रियता पाहून राष्ट्रवादी काँग्रेसने निर्मला नवले यांना युवती कार्याध्यक्षपद देऊ केले होते. राज्यभरातील युवतींचे संघटन मजबूत करून त्याचा पक्षाला फायदा होईल, असे त्यामागचे नियोजन होते. नवले यांनी विविध भागात दौरेही केले. कारेगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराचा त्यांना अनुभव होताच. त्यामुळेच त्यांनी पंचायत समितीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. परंतु लोकांची साथ न लाभल्याने त्यांना पराजयाला सामोरे जावे लागले. पराभवानंतर त्यांनी भावुक पोस्ट लिहिली आहे.
advertisement

निर्मला नवले काय म्हणाल्या आहेत?

माझ्या नेतृत्वावर निस्वार्थपणे जीवापाड प्रेम करणाऱ्या, आणि माझ्या सुख-दुःखात सदैव प्रामाणिकपणे माझ्यासोबत उभे राहणाऱ्या, मी निवडून येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद. तुमची निर्मला पंचायत समितीवर जाण्यासाठी मागील दोन महिने आपण सर्वांनी जे अथक परिश्रम घेतले, रात्र-दिवस एक करून जे कष्ट उपसले-त्या प्रत्येक प्रयत्नासाठी मी मनापासून ऋणी आहे, असे निर्मला नवले यांनी म्हटले.
advertisement
तसेच, तुमच्या या साथीनं मला पुन्हा उभं राहण्याची, नव्या जिद्दीनं पुढे जाण्याची ताकद दिली आहे. ही लढाई इथे थांबत नाही... तुमच्यासोबत चालायचा हा प्रवास आजही सुरूच आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया निर्मला नवले यांनी समाज माध्यमांद्वारे दिली. सत्तेचे काय कधी येते कधी जाते... असे भावनिक गीतही त्यांनी स्टोरीला ठेवून आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
advertisement

कोण आहेत निर्मला नवले?

निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती कार्याध्यक्षा आहेत
त्यांनी कारेगाव सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषणवले आहे
पेशाने इंजिनिअर असलेल्या निर्मला नवले यांना समाजसेवेची आवड आहे
सासरच्या नवले कुटुंबात राजकारणाचा वारसा असल्याने त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले
समाज माध्यमांवर त्यांच्या व्हिडीओ, रिल्सला लाखो शेअर कमेंट असतात
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सत्तेचे काय कधी येते कधी जाते... स्टोरीला इमोशनल गाणं, पराभवानंतर निर्मला नवले यांची पहिली प्रतिक्रिया
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement