'रस्त्यावरच्या लाईट्स गेलेल्या माझ्या गाडीसमोर...' सावळ्याची जणू सावली फेम अभिनेत्याचा भीषण अपघात
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सावळ्याची जणू सावली मालिकेतील अभिनेत्याचा भीषण अपघात झाला. या अपघातातून थोडक्यात बचावला. नेमकं काय घडलं हे त्याने पोस्ट शेअर करत सांगितलं.
मराठी मालिकाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'सावळ्याची जणू सावली' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्याचा भीषण अपघात झाला. मालिकेत नीलची भूमिका साकारणारा अभिनेता सुप्रीत कदम याचा अपघात झाला. या अपघातातून तो थोडक्यात बचावला. सुप्रीतच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. मरणाच्या दारातून परत आलेल्या सुप्रीतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या अपघाताची माहिती दिली. त्याच्याबरोबर नेमकं काय घडलं? अपघात कसा झाला हे देखील सांगितलं.
अभिनेता सुप्रीतचा 7 फेब्रुवारी 2026 रोजी वांद्रे येथे अपघात झाल्याची माहिती त्यानं दिली. सकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याचं त्यानं सांगितलं. त्याच्या डोक्यात असेलल्या हेल्मेटमुळे त्याचा जीव वाचला. सुप्रीतनं अपघातानंतरचा त्याचा फोटो शेअर केला आहे. त्याचा दोन्ही हातांना प्रचंड मार लागला असून हातातून रक्त येताना दिसत आहे.
advertisement
अपघात नेमका कसा झाला हे सुप्रीतनं पोस्टमध्ये सांगितलं. त्याने लिहिलंय, "फोटो टाकण्यामागे कारण अस आहे की बांद्रा कार्टर रोड वर 7 फेब्रुवारी 2026 ला संध्याकाळी 7 वाजता माझं एक्सीडेंट झालं. रस्त्यवरच्या लाइट्स गेलेल्या आणि एक काळ्या रंगाचा कुत्रा रोड क्रॉस करता करता माझ्या बाईक खाली आला."
"संगायचा मुद्दा असा की एक्सीडेंट मोठं झालं पण मी थोडक्यात बचावलो माझ्या हेलमेटमुळे. आपण किती गाडी सेफ चालवत असलो तरी समोरच्या कुठल्या ही गोष्टीमुळे असे प्रसंग कधीही येऊ शकतात. हेलमेटमुळे आपला जीव वाचू शकतो. कृपया करून हेलमेट कंपल्सरी वापरा. धन्यवाद"
advertisement

सुप्रीतच्या अपघाताची माहिती समोर येताच त्याच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी काळजी व्यक्त केली आहे. अनेकांनी त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थने केली आहे. सावळ्याची जणू सावली मालिकेतील सावली म्हणजे अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिनं सुप्रीतच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलंय, "इतकं लागलंय तरी तो 14 तास शूटींग करतोस. हॅट्स ऑफ." तर सुप्रीतच्या अनेक चाहत्यांनी "लवकर बरा हो, काळजी घे", असं म्हणत त्याला धीर दिलाय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 2:52 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'रस्त्यावरच्या लाईट्स गेलेल्या माझ्या गाडीसमोर...' सावळ्याची जणू सावली फेम अभिनेत्याचा भीषण अपघात








