advertisement

12 लाख वर्षांपूर्वीच्या मानव संस्कृतीचे दुर्मिळ पुरावे, डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात अनोखा ठेवा, Video

Last Updated:

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. या संस्थांचा स्वतःचा एक समृद्ध इतिहास आहे.

+
News18

News18

पुणे : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. या संस्थांचा स्वतःचा एक समृद्ध इतिहास आहे. त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाची आणि जागतिक स्तरावर ओळख असलेली संस्था म्हणजे डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट. ब्रिटिश काळात स्थापन झालेलं हे कॉलेज केवळ शिक्षणासाठीच नव्हे, तर भारताच्या प्राचीन इतिहासाचा शोध घेणाऱ्या पुरातत्त्व संशोधनासाठीही प्रसिद्ध आहे.
डेक्कन कॉलेजचा इतिहास तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धाच्या काळापर्यंत जातो. या कॉलेजमध्ये 1939 साली पुरातत्त्व विभागाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1943 पासून डॉ. धीरजलाल सांकलिया यांच्या नेतृत्वाखाली भारतात शास्त्रीय पद्धतीने उत्खनन कार्याला सुरुवात झाली. या विभागामुळे भारतीय पुरातत्त्व संशोधनाला एक नवी दिशा मिळाली.
advertisement
आजपर्यंत डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाने भारतभर 100 ते 150 हून अधिक उत्खनने केली आहेत. या उत्खननांमधून अश्मयुग, ताम्रपाषाण संस्कृती, ऐतिहासिक काळ अशा विविध टप्प्यांतील मानव संस्कृतीचे महत्त्वपूर्ण अवशेष उजेडात आणले आहेत. विशेष म्हणजे, कॉलेजच्या संग्रहालयात सुमारे 12 लाख वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन मानवाचे पुरावे जतन करून ठेवण्यात आले आहेत. हे पुरावे माणसाच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यांची माहिती देणारे अत्यंत दुर्मिळ अवशेष मानले जातात.
advertisement
माणसाच्या उत्क्रांतीची पहिली अवस्था ते आधुनिक काळापर्यंतचा प्रवास या उत्खननांमधून स्पष्टपणे समोर येतो. ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष, अश्मयुगीन हत्यारे, पाषाणयुगातील वस्तीचे पुरावे तसेच ऐतिहासिक काळातील विविध उत्खनन स्थळे या विभागाने अभ्यासली आहेत. माहूर झरी, भागीमारी, हेरवाडा यांसारख्या ठिकाणी करण्यात आलेली उत्खनने विशेष महत्त्वाची मानली जातात.
इतिहासकालीन भारताचा रोम तसेच इतर आशियाई देशांशी असलेला व्यापार समजून घेण्यासाठी रायगड परिसरातही उत्खनन करण्यात आले आहे. या उत्खननांतून तत्कालीन व्यापारी मार्ग, नाणी आणि इतर साहित्यिक पुरावे समोर आले आहेत. यामुळे भारताचा प्राचीन जागतिक व्यापारातील सहभाग अधोरेखित होतो.
advertisement
डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे, तर अफगाणिस्तान, बांगलादेश, इराण, थायलंड, अमेरिका, कॅनडा यांसारख्या देशांतून विद्यार्थी येतात. त्यामुळे हे कॉलेज आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरातत्त्व संशोधनाचे केंद्र बनले आहे.
या संदर्भात माहिती देताना डॉ. अभिजित दांडेकर, सहयोगी प्राध्यापक, पुरातत्त्व विभाग, डेक्कन कॉलेज, यांनी सांगितले की, अश्मयुगीन मानवाचे जे प्राचीन पुरावे आम्हाला सापडले आहेत, त्यांचे वय साधारणपणे 12 लाख वर्षांइतके जुने आहे. हे पुरावे मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
advertisement
डेक्कन कॉलेजचा पुरातत्त्व विभाग आजही भारताच्या प्राचीन इतिहासाचा शोध घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असून, भविष्यातही मानव संस्कृतीच्या अनोख्या रहस्यांचा उलगडा करण्याचे काम करत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
12 लाख वर्षांपूर्वीच्या मानव संस्कृतीचे दुर्मिळ पुरावे, डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात अनोखा ठेवा, Video
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement