advertisement

शेतकऱ्याची लेक झाली 'एमडी' डॉक्टर! करमाळ्याच्या डॉ. गौरी झोळ यांची वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग झेप; संघर्षाची प्रेरणादायी कहाणी

Last Updated:

डॉ. गौरी अनुरथ झोळ यांनी वाशिंबे येथून एमडी डर्मेटोलॉजी मिळवून ग्रामीण जिद्दीचे प्रतीक ठरले. झोळ कुटुंबाने दोन्ही मुलींना उच्चशिक्षित करून आदर्श निर्माण केला.

News18
News18
काही यशकथा केवळ कागदावरच्या पदव्यांपुरत्या मर्यादित नसतात, त्या कष्टाला प्रतिष्ठा मिळवून देतात. वाशिंबे सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या आणि एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. गौरी अनुरथ झोळ यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या एमडी डर्मेटोलॉजी या पदव्युत्तर अभ्यासक्रमात यश मिळवून एक नवा इतिहास रचला आहे.
मातीच्या कुशीतून 'एमडी'पर्यंतचा प्रवास
डॉ. गौरी यांचा प्रवास सोपा नव्हता. मातीशी नातं जपणाऱ्या झोळ कुटुंबात कष्ट, शिस्त आणि संयमाचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. बारामतीमधील शारदानगर येथे शालेय शिक्षण आणि त्यानंतर पुणे व मुंबईत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना त्यांनी कधीही आपल्या मुळांना विसरू दिले नाही. वैद्यकीय शिक्षणातील प्रचंड स्पर्धा आणि अभ्यासाचा ताण यावर मात करत त्यांनी मिळवलेले हे यश म्हणजे ग्रामीण भागातील जिद्दीचे प्रतीक आहे.
advertisement
आई-वडिलांच्या कष्टाचे सार्थक
या यशाचे खरे शिल्पकार ठरले ते म्हणजे अनुरथ झोळ आणि लक्ष्मी झोळ. स्वतःच्या गरजांना मुरड घालून, शेतात घाम गाळून या दाम्पत्याने आपल्या मुलींच्या स्वप्नांना बळ दिले. गौरी सांगते, "हे यश माझे एकटीचे नाही, तर माझ्या आई-वडिलांच्या कष्टाचे फळ आहे. वडिलांनी माझ्या पंखांना बळ दिले, तर आईने प्रत्येक संकटात माझा धीर वाढवला. त्यांच्या डोळ्यांतील समाधान, हेच माझे खरे यश आहे."
advertisement
केवळ पदवी नाही, तर सामाजिक जाणीव
डॉ. गौरी केवळ एक डॉक्टर म्हणून मिरवणार नाहीत, तर त्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीवही जपली आहे. "माझे शिक्षण केवळ माझ्यासाठी नाही, तर समाजातील गरजू रुग्णांसाठी आहे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील मुलींना संदेश देताना त्या म्हणतात, "परिस्थिती कितीही कठीण असली, तरी स्वप्न पाहणं सोडू नका. मेहनत आणि संयम असेल, तर नियतीही तुमच्यासाठी वाट मोकळी करते."
advertisement
कौतुकाचा वर्षाव
करमाळा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून डॉ. गौरी झोळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांची लहान बहीण मानसी झोळ हिने देखील 'बीबीए इंटरनॅशनल बिझनेस'चे शिक्षण पूर्ण केले असून, झोळ कुटुंबाने आपल्या दोन्ही लेकींना उच्चशिक्षित करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.
view comments
मराठी बातम्या/Success Story/
शेतकऱ्याची लेक झाली 'एमडी' डॉक्टर! करमाळ्याच्या डॉ. गौरी झोळ यांची वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग झेप; संघर्षाची प्रेरणादायी कहाणी
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement