Gold-Silver Rate: सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी वाढ! खरेदीची हीच योग्य संधी? एक्सपर्ट म्हणतात...
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Gold-Silver Price: गेल्या आठवड्यात मोठ्या घसरणीनंतर सोनं आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. चला पाहूया किती रुपयांनी वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती...
Gold-Silver Price: गेल्या आठवड्यात सोनं आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली. ज्यानंतर गुंतवणुकदारांना घाम फुटला. दोन्हीही सत्रांमध्ये चांदी जवळपास 10 टक्के खाली गेल्या. तर सोन्यामध्ये 2 टक्क्यांची घसरण झाली होती. मात्र नवीन आठवड्याच्या सुरुवातीने चित्र बदलले आहेत. सोमवारी वायदा बाजारात जबरदस्त वाढीसह दोन्हीच्या किंमती वाढल्या आहेत. ज्यामुळे गुंतवणुकदारांच्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण झालाय की, ही सोनं खरेदीची योग्य संधी आहे का? की आणखी घसरणीची वाट पाहणं योग्य ठरेल? चला पाहूया...
advertisement
advertisement
आंतरराष्ट्रीय बाजारात, सोने गेल्या महिन्यातील ऐतिहासिक घसरणीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. जानेवारीच्या अखेरीस विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, किमतींमध्ये झपाट्याने घट झाली, परंतु आता त्या घसरणीच्या जवळपास निम्मी वाढ झाली आहे आणि प्रति औंस 5,000 डॉलरच्या आसपास आहे. सोमवारी, त्यात अंदाजे 1.7 टक्के वाढ झाली.
advertisement
चांदी अजूनही खूप अस्थिर आहे : चांदी अजूनही खूप अस्थिर आहे. सट्टेबाजी आणि कमी ओव्हर-द-काउंटर व्यवहारामुळे तीक्ष्ण हालचाल होत आहेत. चांदी, जी त्याच्या विक्रमी उच्चांकावरून एक तृतीयांशपेक्षा जास्त घसरली होती, सोमवारी 5 टक्क्यांनी वाढून 80 डॉलर औंसच्या वर गेली. येत्या काही दिवसांत, बाजार अमेरिकेतील आर्थिक आकडेवारीवर बारकाईने लक्ष ठेवेल. विशेषतः, नवीनतम रोजगार रिपोर्ट आणि चलनवाढीचा डेटा फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांवरील भविष्यातील भूमिकेचे संकेत देईल.
advertisement
इकॉनॉमिक्स टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, प्रिथ्वी फिनमार्टचे मनोज कुमार जैन म्हणतात की, अमेरिकेच्या कंज्यूमर सेंटीमेंट इंडेक्स 57.3 पर्यंत पोहोचल्याने किंमती धातुंना सहारा मिळू शकतो. खरंतर सोनं आणि चांदी दोन्हीमध्ये चढ-उतार कायम राहू शकतो. त्याच्यानुसार डॉलर इंडेस्टमध्ये हालचाल, अमेरिकेत आंशिक सरकारी शटडाउन आणि जागतिक भू-राजकिय तणावामुळे या आठवड्यात बाजारात अस्थिरता राहू शकते.
advertisement
एक्सपर्ट्सचे दीर्घकालीन विचार काय आहेत? : अभिलाष कोईक्कारा (प्रमुख - फॉरेक्स आणि कमोडिटीज, नुवामा प्रोफेशनल क्लायंट ग्रुप) म्हणतात, "अलीकडील घसरणीनंतर एमसीएक्स गोल्डला मजबूत आधार मिळाला आहे आणि आता तो पुन्हा वरच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. सध्या किंमत ₹1,59,000 च्या आसपास आहे. आमचे लक्ष्य ₹1,75,000 आहे आणि सुरक्षिततेसाठी स्टॉपलॉस ₹1,47,000 वर ठेवला पाहिजे. चांदीमध्येही सकारात्मक ट्रेंड दिसून येत आहे. किंमत सध्या ₹2,84,000 च्या आसपास आहे आणि ती ₹3,30,000 च्या दिशेने जाऊ शकते. अलिकडच्या तेजीमुळे हा ट्रेंड आणखी मजबूत झाला आहे."
advertisement
प्रणव मेर (उपाध्यक्ष, जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस) यांच्या मते, "सोन्याचे भाव सध्या एका श्रेणीत व्यवहार करत आहेत आणि हळूहळू सुधारत आहेत, त्यामुळे भविष्यातील अंदाज सकारात्मक आहे. तसंच, चांदीमध्ये उच्च अस्थिरता येत आहे आणि भविष्यात थोडीशी घट दिसून येऊ शकते... दीर्घकालीन, विशेषतः 2026 पर्यंत, सोने आणि चांदीला मजबूत आधार मिळू शकतो. हे मध्यवर्ती बँकेच्या खरेदी आणि जागतिक तणाव यासारख्या घटकांमुळे आहे. याचा अर्थ असा की अल्पकालीन अस्थिरता असेल, परंतु दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक आहे."
advertisement









