advertisement

PMC : एकाच पदावर आधी पत्नीची सेवा, आता पतीची कमान; पुण्याचे नवे उपमहापौर RPIचे परशुराम वाडेकर नेमके कोण?

Last Updated:

भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे

नवे उपमहापौर परशुराम वाडेकर
नवे उपमहापौर परशुराम वाडेकर
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या नव्या कारभाऱ्यांची घोषणा झाली असून, भाजपने अपेक्षेप्रमाणे आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.
कोण आहेत उपमहापौर परशुराम वाडेकर?
परशुराम वाडेकर हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) निष्ठावंत नेते आहेत. विशेष म्हणजे, महायुतीच्या जागावाटपात त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. वाडेकर यांच्या निवडीने एक दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. गेल्या टर्ममध्ये त्यांच्या पत्नी सुनिता वाडेकर यांनी पुण्याचे उपमहापौरपद भूषवले होते. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत परशुराम वाडेकर हेदेखील या महत्त्वाच्या पदावर विराजमान झाले आहेत. एकाच कुटुंबात पत्नीपाठोपाठ पतीला हे मानाचे पद मिळण्याची ही शहरातील पहिलीच घटना असावी.
advertisement
महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड
महापौरपद 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने वर्षा तापकीर, रंजना टिळेकर यांसारख्या ज्येष्ठ नावांची चर्चा होती. मात्र, पक्षाने उच्चशिक्षित आणि कार्यक्षम चेहरा म्हणून मंजुषा नागपुरे यांना संधी दिली. राष्ट्रवादीच्या शितल सावंत आणि काँग्रेसच्या अश्विनी लांडगे यांनी माघार घेतल्याने नागपुरे यांची निवड बिनविरोध झाली.
विरोधकांची माघार आणि भाजपची एकहाती सत्ता
पुणे महापालिकेत ११९ जागांसह भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांचे पारडे आधीच जड होते. राष्ट्रवादीचे दत्तात्रय बहिरट आणि काँग्रेसचे साहिल केदारी यांनी उपमहापौर पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने परशुराम वाडेकर यांचा मार्ग मोकळा झाला. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने मित्रपक्षाला (RPI) दिलेला हा शब्द पाळल्याचे या निवडीतून स्पष्ट होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
PMC : एकाच पदावर आधी पत्नीची सेवा, आता पतीची कमान; पुण्याचे नवे उपमहापौर RPIचे परशुराम वाडेकर नेमके कोण?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement