advertisement

Latur ZP Election Results : मराठवाड्यात सगळ्यात मोठा उलटफेर, राज ठाकरेंच्या शिलेदारांनी फोडला भाजपचा बालेकिल्ला!

Last Updated:

लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

मराठवाड्यात सगळ्यात मोठा उलटफेर, राज ठाकरेंच्या शिलेदारांनी फोडला भाजपचा बालेकिल्ला!
मराठवाड्यात सगळ्यात मोठा उलटफेर, राज ठाकरेंच्या शिलेदारांनी फोडला भाजपचा बालेकिल्ला!
शशिकांत पाटील, प्रतिनिधी
लातूर : लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मनसेचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. रेणापूर तालुक्यातील पानगाव गटातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉक्टर सुनील नागरगोजे यांचा विजय झाला आहे. तर पंचायत समितीच्या गणातून मनसेच्या मोनिका रवी सूर्यवंशी आणि श्रीदेवी गालफाडे यांना विजय मिळाला आहे.
advertisement
लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये थेट लढत होत आहे, पण अनपेक्षितपणे मनसेचे उमेदवार निवडून आले आहेत. लातूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसकडून अमित देशमुख तर भाजपकडून संभाजीराव निलंगेकर पाटील आणि अभिमन्यू पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 2017 साली झालेल्या लातूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपने 36 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती.
advertisement
लातूर जिल्हा परिषदेचे आतापर्यंतचे निकाल
लातूर तालुक्यातील महाराणा प्रताप नगर जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे महादेव मस्के विजयी
लातूर तालुक्यातील भातांगळी जिल्हा परिषद गटातून भाजपचे पांडुरंग बालवाड विजयी.
लातूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव गटातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉक्टर सुनील नागरगोजे विजयी तर पंचायत समितीच्या गणातून मनसेच्या मोनिका रवी सूर्यवंशी आणि श्रीदेवी गालफाडे विजयी
advertisement
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील खंडाळी गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शितल खोमणे विजयी
लातूर : जळकोट तालुक्यातील वांजरवाडा जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार धर्मपाल देवशेट्टे...
लातूर : लातूर तालुक्यातील आर्वी गटातून काँग्रेसच्या राजश्री देशमुख विजयी... तर दोन्ही पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात...
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur ZP Election Results : मराठवाड्यात सगळ्यात मोठा उलटफेर, राज ठाकरेंच्या शिलेदारांनी फोडला भाजपचा बालेकिल्ला!
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement