विधानसभेचा वचपा काढला, मोहिते पाटील-जानकरांना अस्मान दाखवलं, विजयानंतर सातपुते म्हणाले, ती अवलाद जन्माला यायचीये...!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Solapur ZP Sanskruti Satpute Win: राम सातपुते यांनी विधानसभेला झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली. विशेष म्हणजे जानकर-मोहिते पाटील यांचा गट एकत्र असूनही सातपुते यांनी आपली ताकद दाखवून दिली.
सोलापूर (माळशिरस) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेतील दहिगाव गटात भाजपचे नेते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी जीवन जानकर यांना पराभवाची धूळ चारली आहे. एका अर्थाने राम सातपुते यांनी विधानसभा निवडणुकीचा वचपा काढला. विधानसभेला झालेल्या पराभवाची सातपुते यांनी सव्याज परतफेड केली. विशेष म्हणजे जानकर-मोहिते पाटील गट एकत्र असूनही सातपुते यांनी आपली ताकद दाखवून दिली.
उत्तमराव जानकर यांनी विधानसभेला राम सातपुते यांना पराभूत केले होते. तेव्हापासून मोहिते पाटील-जानकर यांचे माळशिरसच्या राजकारणावर विशेष वर्चस्व राहिले. परंतु तरीही सातपुते गटाने मागे न हटता दोन्ही गटांविरोधात संघर्ष केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सातपुते यांना विशेष ताकद दिली. माळशिरसच्या दहिगाव जिल्हा परिषद गटातून राम सातपुते यांनी पत्नी संस्कृती सातपुतेंना उमेदवारी दिली आणि निवडूनही आणले.
advertisement
विजयानंतर सातपुतेंनी मोहिते पाटील-जानकरांना डिवचले
दहिगावमधून विजय मिळवल्यानंतर माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटील-जानकरांना डिवचले. माळशिरसमधून भाजपचा सुपडा साफ करणारी अवलाद अजून जन्माला यायचीये, अशा शब्दात त्यांनी बोचरा वार केला. आम्ही बाजू सत्याची होती, जनतेने आम्हाला स्वीकारले, असे राम सातपुते म्हणाले.
विजयानंतर कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष
संस्कृती सातपुते यांनी विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अक्षरश: गुलालात न्हाऊन निघाले. ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्ते आनंदाने नाचले. राम सातपुते आणि संस्कृती सातपुते यांनीही विजयी आनंद साजरा केला.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 12:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विधानसभेचा वचपा काढला, मोहिते पाटील-जानकरांना अस्मान दाखवलं, विजयानंतर सातपुते म्हणाले, ती अवलाद जन्माला यायचीये...!









