शिवनेरी, शिवशाहीनंतर आता 'राजमाता जिजाऊ' बस, एसटी ऐतिहासिक निर्णय; जाणून घ्या कधीपासून धावणार
Last Updated:
ST New Bus Service: प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता प्रवाशांना एका नव्या एसटीमधून प्रवास करता येणार आहे. मात्र नेमकी कोणती गोष्ट यात वेगळेपण देणारी आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नव्या आणि आधुनिक बस दाखल होणार असून प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. विशेष म्हणजे या नव्या बससेवेत अनेक बाबतीत वेगळेपण पाहायला मिळणार आहे.
एसटीच्या गौरवशाली परंपरेत नवा अध्याय
महाराष्ट्राच्या इतिहासातील महान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान म्हणून एसटी महामंडळाने नव्या बससेवेला राजमाता जिजाऊ असे नाव. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. यापूर्वी एसटीने शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी बसेस सुरू करून इतिहास आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधला आहे. आता त्याच परंपरेत राजमाता जिजाऊ या नावाची भर पडली आहे.
advertisement
प्रवाशांच्या सोयींना प्राधान्य
राज्यभरातील वर्दळीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये यासाठी एसटीने 3 बाय 2 आसन रचनेच्या 55 आसनी अत्याधुनिक बस खरेदी केल्या आहेत. या बसमध्ये प्रशस्त आसन व्यवस्था, अधिक आरामदायी रचना आणि आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत
कधीपासून येणार सेवेत
या नव्या राजमाता जिजाऊ बस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. भगव्या आणि पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बस आकर्षक दिसणार असून एसटीच्या ओळखीला नवी झळाळी मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 12:17 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
शिवनेरी, शिवशाहीनंतर आता 'राजमाता जिजाऊ' बस, एसटी ऐतिहासिक निर्णय; जाणून घ्या कधीपासून धावणार







