कोल्हापूर जिल्हाा परिषद निवडणुकीत नोटांचा पाऊस
सांगलीतील जत तालुक्यातील नऊ पैकी आठ जिल्हा परिषद गटामध्ये भाजपला जनतेने विजय मिळवून दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत तालुक्यात विकासाचा जो धडाका लावला आहे. त्यामुळे जनतेने भाजपला यश दिलेलं आहे. आटपाडी तालुक्यात मात्र अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. यामध्ये तीन जागांवर भाजपचा पराभव झालाय. केवळ निंबवडे या गटामध्ये भाजपचा विजय झालाय. ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झालाय त्या ठिकाणची मी जबाबदारी स्वतः घेतो. यापुढे चुका दुरुस्त करून आम्ही लोकांपुढे जाऊ. – पडळकर
बारामती जिल्हा परिषद गटामधून तसंच पंचायत समिती गणा मधून विजयी झालेल्या उमेदवारांनी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे.
दिवंगत अजितदादांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आमचा आमचा विजय झाला असल्याचे या विजयी उमेदवारांनी सांगितलं असून गड आला पण आमचा सिंह गेला, अशा प्रतिक्रिया देखील या विजयी उमेदवारांनी व्यक्त केल्या आहेत.
धाराशिव जिल्हा परिषद – पक्षनिहाय विजयी उमेदवारांची संख्या पक्ष – 55/55
विजयी जागा – भाजपा (BJP)- 19
शिवसेना (शिंदे गट) -15
ठाकरे गट (UBT) -7
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 6
अपक्ष – 4
काँग्रेस – 3
समाजवादी पक्ष -०1
एकूण निकाल लागलेले -55
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचे 23 सदस्य निवडून आले तर शिवसेना शिंदे गटाचे 21 सदस्य निवडून आले आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या मतदार संघात भाजप आणि ठाकरे सेनेला प्रत्येकी दोन- दोन जागा मिळाल्या पालकमंत्र्यांना मात्र भोपळा फोडला गेला नाही. त्यासोबतच पंचायत समितीच्या 9 पैकी 6 पंचायत समित्यांवर भाजपाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे तर 3 ठिकाणी शिंदे गटाचे वर्चस्व आहे. यामध्ये सिल्लोड सोयगाव मतदारसंघात या अगोदर एक हाती सत्ता घेणाऱ्या अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसला असं भाजप नेत्यांच्या सत्तेला सुरुंग लावले, सिल्लोड सोयगाव पंचायत समितीवर भाजपने वर्चस्व स्थापन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजी-माजी पालकमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या सत्तेला सुरुंग लागलाय.
भाजपा – 16
राष्ट्रवादी अजित पवार – 06
शिंदेसेना – 07
काँग्रेस – 11
राष्ट्रवादी शरद पवार – 18
शिवसेना ठाकरे पक्ष – 01
रयत क्रांती संघटना – 01
जनसुराज्य शक्ती पक्ष – 01
जिल्हा परिषद धाराशिव निवडणूक अंतिम निकाल
1. भारतीय जनता पार्टी (BJP): 19 जागा
2. शिंदे शिवसेना: 15 जागा
3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC): 3 जागा
4. समाजवादी पार्टी: 1 जागा
5. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना: 7 जागा
6. अपक्ष: 4 जागा
7. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP): 6 जागा
समोर भाजप शिवसेना युती असताना आम्ही आमचा नेता गमवला आमच्यावर एवढी मोठी संकट आली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने चांगल्या प्रकारे लढत देऊन यश संपादन केले आहे अजितदादा असते तर अजून यामध्येभर पडली असती
विरोधकांनी टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसला आता नेता राहिला नाही अशा प्रकारे खालच्या पातळीला जाऊन टीका केली आम्ही एकटे लढून पण चांगले संपादन केले
एकूण जागा : 56
भाजप- 04
शिंदे शिवसेना – 40
राष्ट्रवादी अजित पवार गट- 5
शिवसेना ठाकरे गट – 6
मनसे -1
काँग्रेस –
राष्ट्रवादी शरद पवार गट -0
अपक्ष – 0
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील भडगाव जिल्हा परिषद गट हा कोकणातील दोन नेत्यांच्या प्रतिष्ठेचा झाला होता कारण याच जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे नेते रामदास कदम आमदार तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेनेचे उपनेते संजय कदम यांची गावी आहेत याच गटातून सुनील तटकरे यांचे सख्खे मेहुणे अजय बिरवटकर हे निवडून आले अत्यंत अटीतटीची आणि प्रतिष्ठेची ठरलेल्या या गटात बिरवटकर निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या पत्नी सौ वरदा तटकरे तसेच आमदार अनिकेत तटकरे यांच्या पत्नी यांनी खेडमध्ये येऊन अजय बिरवटकर यांना शुभेच्छा दिल्या
–
– माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विद्यमान आमदार दिलीप सोपल गटाचा केला सुफडा साफ
– बार्शीतील जिल्हा परिषदच्या 6 पैकी 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागांवर भाजप
– बार्शीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर मा.आ. राजेंद्र राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून माजी आमदार राजेंद्र राऊत यांची ओळख
– भाजपा विरुद्ध सर्वपक्षीय लढाईमध्ये भाजपचा जोरदार विजय
यावेळी सिल्लोड मध्ये मोठा उलटफेर
आमदार अब्दुल सत्तार यांच्या सत्तेला भाजपाचे सुरूंग
सिल्लोड पंचायत समिती भाजपने घेतली ताब्यात
18 पैकी भाजपकडे 10 सदस्य तर शिंदे सेनेला 8 सदस्य
या अगोदर आमदार अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व होते कायम
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट तालुका निहाय मिळालेल्या जागा
बारामती 6
हवेली 4
इंदापूर 8
शिरूर 4
वेल्हा (राजगड)2
दौंड 6
मावळ 4
मुळशी 2
खेड 3
जुन्नर 4
आंबेगाव 3
भोर 2
पुरंदर 2
कोपर्डे जिल्हा परिषद गटातून भाजप बंडखोर उमेदवार अपक्ष विद्या रामकृष्ण वेताळ विजयी…
आमदार मनोज घोरपडे यांना मोठा धक्का
समर्थकांचा मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष…
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत बहिण भाऊ विजयी
जिल्हा परिषदेसाठी मंगरूळ गटातून बहीण सीमा माडजे रोचकरी, तर आरणी पंचायत समितीसाठी कृष्णा रोचकरी
दोन्ही बहीण भावाच्या विजयाने समाजवादी पक्षाने हे जिल्हा परिषद आणि तुळजापूर पंचायत समितीत खात उघडलं
महायुतीच संख्याबळ पाहता समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला येणार भाव
विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा देण्यात येणार असल्याचा विजयी उमेदवाराचा संकल्प



