भाजपने ६ वर्षांसाठी हकालपट्टी केली, नाकावर टिचून विजय मिळवला, कोण आहे मायकल डिसोझा?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Sindhudurga zp Election 2026 : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत कोलगाव गटातून मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला असून अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद निवडणुकीत कोलगाव गटातून मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला असून अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी भाजपाचे महेश सारंग यांना पराभूत करत हा गट आपल्या ताब्यात घेतला. स्थानिक राजकारणात हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.
पक्षविरोधी कारवाईनंतरही विजयाची नोंद
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली होती. अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करून अर्ज कायम ठेवणे तसेच विरोधी उमेदवारांना पाठिंबा देणे या कारणांवरून भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कठोर भूमिका घेतली. सिंधुदुर्गमधील २३ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले.
advertisement
या कारवाईत राजेंद्र म्हापसेकर, मायकल डिसोझा, शर्वाणी गावंकर, रुपेश पावसकर आणि योगेश तावडे यांसारख्या नावांचा समावेश होता. मात्र, निलंबनाच्या निर्णयानंतरही मायकल डिसोझा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला. त्यामुळे स्थानिक राजकारणात भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
किती मतदान झाले?
शनिवारी झालेल्या मतदानात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. ग्रामीण भागातील मतदारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. जिल्ह्यात एकूण सरासरी ६१.९८ टक्के मतदान झाले. काही भागांत सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा पाहायला मिळाल्या.
advertisement
जिल्हा परिषदेत बिनविरोध निवडलेले उमेदवार
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत काही गटांत उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे
खारेपाटण – प्राची इस्वालकर (भाजप)
बांदा – प्रमोद कामत (भाजप)
जाणवली – रुहिता तांबे (शिंदे शिवसेना)
पडेल – सुयोगी घाडी (भाजप)
बापर्डे – अवनी तेली (भाजप)
पोंगुर्ले – अनुराधा नारकर (भाजप)
किंजवडे – सावी लोके (भाजप)
advertisement
कोळपे – प्रमोद रावराणे (भाजप)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 12:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपने ६ वर्षांसाठी हकालपट्टी केली, नाकावर टिचून विजय मिळवला, कोण आहे मायकल डिसोझा?










