advertisement

Khopoli: 'दीर आहे' म्हणून दरवाजा उघडणं पडलं महागात; मध्यरात्री घडलेल्या घटनेने सर्वजण सुन्न

Last Updated:

Khopoli Shocking News : खोपोलीतील एका घटनेने सर्वच हादरुन गेलेले आहेत. जिथे घरातील एक सदस्य समजणाऱ्या व्यक्तीने महिलेसोबत भयंकर कृत्य केलेला आहे.

News18
News18
खालापूर : खोपोली शहरात पतीच्या ओळखीतीलच एका मित्राकडून विवाहितेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खालची खोपोली परिसरात घडली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ज्याला मित्र मानलं त्यानेच ओलांडली मर्यादा
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ती घरात एकटी होती. याच वेळी तिच्या पतीचा जुना ओळखीचा मित्र अचानक तिच्या घरी आला. दरवाजा उघडताच त्याने जबरदस्तीने घरात गेला आणि महिलेचा विनयभंग केला.
घटनेनंतर पीडिता घाबरून गेली होती. मात्र तिने संपूर्ण प्रकाराची माहिती खोपोली पोलिस ठाण्यात दिली. तिच्या तक्रारीच्या आधारे संबंधित आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
आरोपी फरार
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे खोपोली परिसरात खळबळ उडाली आहे. ओळखीतील व्यक्तीकडूनच असा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Khopoli: 'दीर आहे' म्हणून दरवाजा उघडणं पडलं महागात; मध्यरात्री घडलेल्या घटनेने सर्वजण सुन्न
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement