advertisement

नेत्यांचे नातलग कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर? राज्यातले 15 धक्कादायक निकाल

Last Updated:

राज्यातील विविध जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आजी-माजी आमदार, खासदारांच्या कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या मैदानात आहेत. पण तिथे काय स्थिती आहे. याची सविस्तर बातमी...

News18
News18
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी आघाडी घेताना दिसत आहे. तर त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला चांगलं यश मिळत आहे. तर काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला जेमतेम जागा मिळताना दिसत आहे. मात्र अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आजी-माजी आमदार, खासदारांच्या कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या मैदानात आहेत. पण तिथे काय स्थिती आहे. याची सविस्तर बातमी...
-सातारा -आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ. प्रिया महेश शिंदे खटाव गटातून 1222 मतांनी आघाडीवर
- पुण्यातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची मुलगी विनया सुधीर मुंगसे आघाडीवर
- अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गटातून भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी आघाडीवर, शांभवी कल्याणशेट्टी या चपळगाव गटातून आघाडीवर
- परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांचे बंधू श्रीकांत विटेकर आघाडीवर
advertisement
- शिरूरचे माजी आमदार पोपट राव गावडे यांचे चिरंजीव भाजपचे राजेंद्र गावडे आघाडीवर
- आमदार विश्वजीत कदम यांचा भाचा आणि स्वर्गीय पतंगराव कदम यांचा नातू काँग्रेसचे ऋषिकेश लाड कुंडल जिल्हा परिषद गटातून आघाडीवर
- दौंडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव पिछाडीवर, केडगाव बोरीपारधी गटातून तुषार थोरात पिच्छाडीवर
advertisement
- संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील गणोरी गटातून आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतणे निखिल चव्हाण आघाडीवर
- माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या पत्नी सुनिता वाघचौरे पिछाडीवर
- सोलापूर दहीगाव जिल्हा परिषद गटात भाजपच्या संस्कृती राम सातपुते यांचा विजय
- माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचा पुत्र जीवन जानकर यांचा पराभव
- माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांचे खंदे समर्थक व निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेकेकले माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव आणि समर्थक निवडून आल्याने हा वळसे पाटलांना धक्का म्हणावा लागेल.
advertisement
-पंढरपूर तालुक्यातील करकंब गटातून भाजपचे आदिनाथ देशमुख विजयी, आमदार अभिजीत पाटील यांना मोठा धक्का
- धाराशिवच्या तेर मतदारसंघातून भाजपाच्या अर्चना पाटील आघाडीवर, त्या भाजपचे आमदार राणा जगदीश पाटील यांच्या पत्नी आहेत
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नेत्यांचे नातलग कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर? राज्यातले 15 धक्कादायक निकाल
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement