TRENDING:

Manoj Jarange: छगन भुजबळ भुरटा नेता, माझ्या नादी लागू नको... मनोज जरांगेंचा हल्लाबोल

Last Updated:

अजित पवारांनी बीड जिल्हा दुसऱ्याच्या हातात द्यावा, असेही जरांगे म्हणाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड :  जीआर रद्द करण्याची खोड भुजबळांनी काढू नये...आमच्या मुळावर उठलात तर ताकद दाखवून देऊ.. बीडमध्ये दहशत माजवण्यासाठी सभा घेतली. तसेच भुजबळांचा भुरटा नेता असा उल्लेख करत जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केला आहे. बीडमध्ये पार पडलेल्या ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यानंतर मनोज जरांगेंनी भुजबळांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे
Manoj jarange- Chhagan bhujbal-
Manoj jarange- Chhagan bhujbal-
advertisement

बीड जिल्ह्यावर दहशत निर्माण करण्यासाठी तसेच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही त्यांची लढाई आहे. यात विशिष्ट जातीचे लोक जमवले,बाकी यांना काही करायचे नाही. ते कुठेही उतरले नाही काही फरक पडणार नाही.त्यांची क्षमता आमच्या लक्षात आली आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

मराठा किती आहे आम्हाला माहीत आहे त्याच्या आकडेमोडीवर कोण लक्ष देत.जीआर रद्द करण्यासाठी तुम्ही दहशत निर्माण करत असाल तर मराठ्यांना सुद्धा एकत्र येऊन तोडीस तोड यत्तर द्यावं लागेल. हीच पवित्र भूमी राज्याचा दिशादर्शक होऊ शकतो याचं दंगली घडवण्याच स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही, असेही जरांगे म्हणाले.

advertisement

अजित पवारांनी बीड जिल्हा दुसऱ्याच्या हातात द्यावा : मनोज जरांगे

फडणवीस यांनी मराठ्यांच मन जिंकला आहे. फडणवीस यांच्या लक्षात आलं आहे. त्याची औकात किती आहे.त्या ग्राउंडवर आमची घोंगडी बैठक झाली आहे. फडणवीस आणि विखे, शिंदे अजितदादा यांना बदनाम करायचं आहे. अजित दादांना बदनाम करण्याचा विडा उचलला आहे.याच्या सभेतून लक्षात आले आहे त्यामुळे पवार यांनी याला बाजूला करावे.अजित पवारांनी बीड जिल्हा दुसऱ्याच्या हातात द्यावा, असेही जरांगे म्हणाले.

advertisement

भुरटा भुजबळ राज्याला साडेसाती : मनोज जरांगे

भुजबळांनी दरिंदे पाटीलच्या टीकेवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे.तो काहीही म्हणो.यांनी राज्याला साडेसाती लावली हा भुरटा भुजबळ राज्याला साडेसाती आहे.मराठ्यांशिवाय विधानसभेला यांना सत्ता मिळाली नाही.आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रमाणपत्र तातडीने द्यावे. पुढच्या आठवड्यात आणखी पश्चिम महाराष्ट्राचा जीआर निघणार आहे.

advertisement

काय म्हणाले होते भुजबळ?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनला भाव वाढ नाहीच, कांदा अन् मक्याला काय मिळाला आज दर? Video
सर्व पहा

आता गप्प बसणार नाही, ओबीसी आरक्षणासाठी कोर्ट आणि रस्त्यावर दुहेरी लढा लढू असा इशारा छगन भुजबळांनी दिला. राज्यभरातून ओबीसी समाज बांधव मेळाव्यासाठी जमले होते. मराठा समाज आणि आमच्या अंतर पडले ते अंतर अंतरवलीच्या दरीद्री पाटलामुळे पडले आहे, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. आरक्षण सामाजिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठी आहे. तो गरिबी हटावचा कार्यक्रम नाही असे भुजबळ म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange: छगन भुजबळ भुरटा नेता, माझ्या नादी लागू नको... मनोज जरांगेंचा हल्लाबोल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल