TRENDING:

रिक्षामध्ये २ लाख ८६ हजारांची बॅग विसरली, 'त्याने' मुंबई पोलिसांना कळवलं, पुढच्या काही तासांत...

Last Updated:

बॅग हरवल्याची तक्रार मिळताच मुंबई पोलीस कामाला लागले. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी रिक्षाचा नंबर शोधून काढला अन्....

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वंजारा, प्रतिनिधी, मुंबई : रिक्षात २ लाख ८६ हजारांची रक्कम असलेली बॅग हरविल्याची तक्रार शिंपोली येथील रहिवासी विश्वास सामंत (वय ६०) यांनी पोलिसांत दिली होती. ही बॅग पोलिसांनी काही तासांत सिनेस्टाईल शोधून काढली.
रिक्षामध्ये २ लाख ८६ हजारांची बॅग विसरली
रिक्षामध्ये २ लाख ८६ हजारांची बॅग विसरली
advertisement

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी पुतण्याच्या लग्नानिमित्त ते बोरिवली पश्चिम येथील मयूर टॉवर चंदावरकर रोड येथे आले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते शिंपोली येथील हॉटेलवर जाण्यासाठी ऑटो रिक्षाने प्रवास करत असताना त्यांची रोख रक्कम २ लाख ८६ हजार रुपये असलेली बॅग प्रवासादरम्यान चुकून ऑटो रिक्षामध्येच राहिली.

सदर तक्रार प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक फौजदार बहिरम आणि पोलीस शिपाई खेडकर यांनी तत्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संबंधित ऑटो रिक्षाचा क्रमांक शोधून काढण्यात आला. त्यानंतर ऑटो रिक्षा चालकास पोलीस ठाण्यात बोलावून कौशल्यपूर्ण चौकशी करण्यात आली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

चौकशीत ऑटो रिक्षामध्ये राहिलेली तक्रारदाराची रोख रक्कम असलेली बॅग सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आली. सदर बॅग आणि रोख रक्कम तक्रारदार विश्वास सामंत यांच्याकडे अधिकृतरित्या सुपूर्द करण्यात आली आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठ्या रकमेची चोरी होण्यापासून बचाव झाला असून तक्रारदाराने समाधान व्यक्त केले जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रिक्षामध्ये २ लाख ८६ हजारांची बॅग विसरली, 'त्याने' मुंबई पोलिसांना कळवलं, पुढच्या काही तासांत...
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल