याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर ते कलबुर्गी दरम्यान गाडी क्रमांक 01451/52 सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी या गाडीचा शुभारंभ देखील झाला आहे. दरम्यान, गाडी जाहीर झाल्यानंतर प्रमुख थांब्यांची मागणी रेल्वेकडून रद्द करण्यात आली होती. मात्र, प्रवासी संघटनांच्या मागणीनंतर माढा, मोहळ, सोलापूर, अक्कलकोट रस्ता, दुधनी आणि गाणगापूर रस्ता या स्टेशनवर ही गाडी थांबवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
advertisement
रेड अलर्ट...! सोलापुरात महापुराचा धोका वाढला, 48 तास धो धो कोसळणार, तापमानात मोठे उलटफेर
या गाडीमुळे सामान्य प्रवाशांसह तीर्थक्षेत्रांना देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची देखील मोठी सोय होणार आहे. कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेसमुळे, कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी मंदिर, पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, सोलापुरातील श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर, अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ मठ आणि कलबुर्गीतील श्री शरणबसवेश्वर मंदिर ही महत्त्वाची तीर्थक्षेत्रं जोडली गेली आहेत. कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेस आठवड्यातून 5 दिवस धावणार आहे. प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी ही गाडी धावणार नाही.