Maharashtra Zilla Parishad Panchayat Samiti Election Result 2026 Live: राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतमोजणी आता जवळपास पूर्ण होत आली आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गट हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. सिंधुदुर्ग, सातारा, सोलापुरात भाजपला आपली सत्ता राखण्यात यश आलं आहे. तिकडे लातूर-परभणीमध्ये उबाठा गटाच्या शिलेदारांनी मैदान दणाणून सोडलं आहे, त्यात मनसेनंही तीन विजय मिळवून आपलं खातं उघडलं आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये काँटे की टक्कर करो या मरो सारखी परिस्थिती आहे. रायगड, पनवेलमध्ये त्यातल्या त्यात महायुतीच्या बाजूनं झुकतं पारडं दिसत आहे. आणखी दोन तासांत निकालाचं चित्र अधिक स्पष्ट होईल.