TRENDING:

Panchayat Samiti Election Live: रत्नागिरीच्या खेडमध्ये मतदान यंत्रात बिघाड, नागरिकांचा संताप

Last Updated:

12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत, निकाल 9 फेब्रुवारीला; रत्नागिरीमध्ये प्रशासन सज्ज, ईव्हीएम मशिन्स पोहोचल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Panchayat Samiti Election Live: 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसासाठी मतदान होणार आहे...सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे... तर 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय. ईव्हीएम मशिन्स प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचवण्यात आल्या आहेत.
News18
News18
advertisement
Feb 07, 20261:53 PM IST

सांगली - 90 वर्षीय आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क..

सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भाळवणी 90 वर्षे आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला आहे.भाळवणी येथील मालती माधवराव कुलकर्णी या 90 वर्षी आजीबाईंनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं आहे.प्रत्येक निवडणुकीच्या मतदानाचा हक्क कुलकर्णी आजी बजावत आहेत,यंदाही त्यांनी कुटुंबासमवेत न चुकता मतदान केले आहे.
Feb 07, 20261:52 PM IST

साताऱ्यात किती झालं मतदान?

सातारा — सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान 7.30 ते 11.30 पर्यत. 21.30 टक्के मतदान.
Feb 07, 20261:08 PM IST

दोन संशयीत बोगस मतदारांना नागरिकांनी ताब्यात घेतले

शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती गावातील देवाचीवाडी मतदान केंद्र परिसरातून दोन संशयीत बोगस मतदारांना नागरिकांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. हे दोन्ही संशयित मतदान केंद्र परिसरात फिरत असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडले आहे. हे दोघे संशयित मतदान केंद्र परिसरात फिरत असले तरी या दोन्ही संशयितांनी मतदान केले नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिस पुढील तपास करत आहेत.
advertisement
Feb 07, 20261:01 PM IST

- तासगाव तालुक्यातल्या बलगवडे मध्ये गाव बंद ठेवून मतदानावर बहिष्कार

सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडत आहे.या निवडणुकीवर तासगाव तालुक्यातल्या बलगवडे येथील ग्रामस्थांनी बहिष्कार घातला आहे.गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जवळपास साडेबारा हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. गावातल्या गायरान जमिनीवर राज्य सरकारच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतोय मात्र बेकायदेशीर रित्या गावकऱ्यांनी लावलेली झाडांची कत्तल करण्यात आली आहे,त्यामुळे ग्रामस्थांनी सौर ऊर्जा प्रकल्प अन्यत्र हलवावा,या मागणीसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर गाव बंद ठेवून बहिष्कार घालण्याचा निर्णय केला होता,त्यानुसार आज पार पडणाऱ्या मतदानावर बलगवडे ग्रामस्थांनी कडून बहिष्कार घालण्यात आला आहे, 2300 इतकं मतदान बलगवडे गावात आहेत,दोन मतदान केंद्र नियुक्त करण्यात आले आहेत,मात्र दुपार पर्यंत या ठिकाणी एकही मतदान झालेलं नाही,
Feb 07, 20261:00 PM IST

सोलापुरात किती झालं मतदान?

– सोलापूर जिल्ह्यात सकाळी 07.30 ते 11.30 वाजेपर्यंत 19.06 टक्के मतदान केलं.
– जिल्ह्यात साडेअकरा वाजेपर्यंत पुरुष मतदारांनी दोन लाख 78 हजार मतदान केले तर एक लाख 90 हजार महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला..
– जिल्ह्यात साडेअकरा वाजेपर्यंत चार लाख 68 हजार पुरुष आणि महिला मतदारांनी मतदान केले..
Feb 07, 202612:15 PM IST

शहाजीबापू पाटील यांनी झेडपी साठी बजावला मतदानाचा हक्क

सोलापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा
शहाजीबापू पाटील यांचा विश्वास सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज त्यांचे मूळ गाव असणाऱ्या महूद या ठिकाणी जाऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान केले. या मतदानानंतर सोलापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकला जाईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
advertisement
Feb 07, 202612:01 PM IST

पुणे जिल्हा परिषदेसाठी पहिल्या दोन तासांत ७.७४ टक्के मतदान

सर्वाधिक मतदान भोर तालुक्यात झाले . ८.७९ टक्के. जुन्नर-७.४२ टक्के
आंबेगाव ८.५६ टक्के
शिरूर-७.२१ टक्के
खेड-७.६५ टक्के
मावळ -८.६३ टक्के
मुळशी-७.०३ टक्के
हवेली-७.७९ टक्के
दौंड-८.१२ टक्के
पुरंदर-८.१ टक्के
वेल्हे-७.९१ टक्के
बारामती-६.५२ टक्के
इंदापूर-७.६८ टक्के
Feb 07, 202610:34 AM IST

एका नवरदेवाने लग्नाच्या गडबडीतही मतदानाचा हक्क बजावला

सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती निवडणुकीसाठी कराड तालुक्यातील तांबवे येथील एका नवरदेवाने लग्नाच्या गडबडीतही मतदानाचा हक्क बजावला आहे. तांबवे येथील विक्रम पाटील यांचा विवाह आज पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन येथे आदिती यांच्याशी संपन्न होत आहे. लग्नाची वेळ दुपारी ठरलेली असतानाही विक्रम यांनी सकाळी सर्वप्रथम मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
Feb 07, 20269:49 AM IST

रत्नागिरीच्या खेडमध्ये मतदान यंत्रात बिघाड

रत्नागिरीच्या खेडमध्ये मतदान यंत्रात बिघाड …. निगडेमधील मतदान केंद्रावरील प्रकार … 1 तास मतदान करण्यासाठी आलेल्यांचा खोळंबा … अनेक मतदार मतदान न करता निघून गेले…. प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे नागरिक संतप्त ….
advertisement
Feb 07, 20269:33 AM IST

नानेगाव मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील नानेगाव मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळ पहायला मिळाला.
Feb 07, 20268:31 AM IST

- सोलापुरातील कोंडी जिल्हा परिषद गटात उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा करण्यात आली

– सोलापुरातील कोंडी जिल्हा परिषद गटात उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा करण्यात आली – शिवसेना ठाकरे गटाच्या कोंडी पंचायत समिती गणाचे उमेदवार सोमनाथ राऊत यांच्याकडून पूजा करण्यात आली – सोलापूर मध्ये झेडपीचे 68 आणि पंचायत समितीचे 136 गणासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे
Feb 07, 20268:30 AM IST

इंदोरी-वराळे जिल्हा परिषद मतदान केंद्र क्रमांक 38 ईव्हीएम मशिन 10 मिनिटांसाठी बंद होते,

इंदोरी-वराळे जिल्हा परिषद मतदान केंद्र क्रमांक 38 ईव्हीएम मशिन 10 मिनिटांसाठी बंद होते, CRC क्लियर केल्यावर मतदान सुरळीत चालू
advertisement
Feb 07, 20267:58 AM IST

भूम तालुक्यातील जयवंत नगर येथे मध्यरात्री मोठा राडा

भूम तालुक्यातील जयवंत नगर येथे मध्यरात्री मोठा राडा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पैसे वाटपावरून मोठा गोंधळ मध्यरात्री भूम तालुक्यातील पाथरूड जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल भोरे यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाढताना रंगेहात पकलणयाचा आरोप लोक दार लावून झोपले असताना मतदार यादीत नाव बघुन घरात एका मताला 5 हजार व 10 हजार रुपये टाकत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सिताराम वनवे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाढताना पकडले रात्रीपासून या परिसरात गोंधळ पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्याना पोलिसांच्या देण्यात आलं ताब्यात गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी
Feb 07, 20267:49 AM IST

छत्रपती संभाजी नगरच्या पिसादेवी येथील बुथ क्रमांक 15 मधील खोली क्रमांक पाच मध्ये असलेले ईव्हीएम मशीन बंद

छत्रपती संभाजी नगरच्या पिसादेवी येथील बुथ क्रमांक 15 मधील खोली क्रमांक पाच मध्ये असलेले ईव्हीएम मशीन बंद ईव्हीएम मशीन खराब झाल्याने मतदानाला सुरुवात नाही सुरुवातीपासूनच ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड मतदान सुरुवात न झाल्यामुळे बुध क्रमांक पंधरा वरील खोली क्रमांक पाच बाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा अधिकारी कर्मचाऱ्यांकडून ईव्हीएम मशीन बदलण्यासाठी तयारी सुरू
Feb 07, 20267:47 AM IST

कराड तालुक्यातील चचेगाव येथे ईव्हीएम मशीन सुरू होईना

कराड तालुक्यातील चचेगाव येथे ईव्हीएम मशीन सुरू होईना सुरुवातीलाच ईव्हीएममुळे मतदानाला उशीर बुथ क्रमांक 78 वरील मशीन बंद काँग्रेस आणि भाजप उमेदवार या ठिकाणी मोठी चुरस मतदान केंद्रावर झोनल अधिकारी दाखल
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Panchayat Samiti Election Live: रत्नागिरीच्या खेडमध्ये मतदान यंत्रात बिघाड, नागरिकांचा संताप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल