Sangali Zilla Parishad Results Live: सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले आहे. जवळपास 70 टक्के इतके मतदानाची नोंद झाली असून आज मतदानाची मतमोजणी पार पडणार आहे,10 तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आजी-माजी आमदार, खासदारांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा आपणाला लागलेली आहे सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. 192 टेबल आणि 122 फेऱ्यांमधून मतमोजणी होणार आहे,प्रशासनाकडून मतमोजणीची जयत तयारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सांगलीचे सगळे अपडेट्स तुम्हाला इथे मिळणार आहेत.