आज संतोष देशमुखांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडेंसह अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना सहआरोपी करा, अशी मागणीही जरांगे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
advertisement
मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?
धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे म्हणाले की, धन्या आडकाठी आणतोय. आरोपी सुटण्यासाठी प्रयत्न करत असले तर त्यांच्या मुंडक्यावर पाय देवू. धनंजय मुंडे आरोपींची आठवण येते असं म्हणतोय. कितीही राक्षस असला तरी नीतीला धरून असायचे. राक्षस नियम पाळायचे. पण ही पैदास राक्षसाची देखील नाही. इथून पुढे जर काड्या केल्या, फोनवर धमकी दिली तर नीट केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत जरांगे यांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे.
आता जशास तसं वागावं लागेल. आपण किती दिवस गप बसायचं. इकडे मूडदे पडायला लागले. एक खून झाला तरी किती भाषण आम्ही ऐकायचे. तो आनंदाने भाषण करतोय. क्रूर हत्याऱ्याची बाजू घेतो. तोही क्रूर आहे. धन्याला सहआरोपी करा. अजितदादा तर वाया गेलेला माणूस आहे. आम्ही अजित दादा आणि फडणवीसांना कोलतो. धनंजय देशमुख तुम्ही तुम्हाला एकटे समजून नका, 6 कोटी मराठे तुमच्यासोबत आहेत. आरोपी जोपर्यंत फासावर जात नाही, तोपर्यंत न्याय नाही, असंही मनोज जरांगे म्हणाले.
