TRENDING:

Nashik Accident : चालकाला डुलकी लागली अन् घात झाला, एसटी बस थेट...मुंबई -आग्रा महामार्गांवर भीषण अपघात

Last Updated:

मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत चालकाला डुलकी लागल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटून मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे.उमराळे जवळ ही अपघाताची घटना घडली आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Nashik Accident News : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत चालकाला डुलकी लागल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटून मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे.उमराळे जवळ ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात तब्बल 28 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना घडताच तत्काळ स्थानिक नागरीकांनी मदतीसाठी धाव घेतली होती. त्यामुळे बचावकार्य युद्धपातळीवर सूरू आहे.
nashik deola accident
nashik deola accident
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई -आग्रा महामार्गांवर मुरबाड डेपोची बस नाशिकहुन मालेगाव कडे जात असताना हा अपघात घडला आहे. चालकाच बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ती जाऊन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याची घटना घडली आहे.पण प्रवाशांनी चालकाला डुलकी लागल्यामुळे ही अपघाताची घटना घडल्याचा आरोप केला आहे.

उमराळे जवळ ही अपघाताची घटना घडली आहे. ही घटना घडताच अपघात झाल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना नजीकच्या रुग्ण्लयात दाखल केले होते.या घटनेत 28 प्रवासी जखमी झाले आहेत.त्यातील 12 प्रवाशांना जास्त मार लागला तर 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.या रुग्णांवर आता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सूरू आहे.

advertisement

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी घटनेचा तपास सूरू केला आहे. या तपासादरम्यान चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तसेय या घटनेनंतर झाडाला आदळलेली बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सूरू आहे.जेणेकरून वाहतूक सूरळीत होईल.

advertisement

नागपूरमध्ये भयंकर अपघात 

नागपूरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामघ्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे.खाजगी बस चालक एका दुचाकी स्वाराला वाचवायला गेल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. नागपूर वर्धा राष्ट्रीय महामार्गावर ही विचित्र अपघाताची घटना घडली आहे. या घटनेमुळे वाहतूक खोळंबली होती.दरम्यान कोणती जिवितहानी झाली आहे का? याची माहिती मिळू शकली नाही आहे.

advertisement

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्यातून दोन बस (एक एसटी एक खाजगी बस) आणि ट्रक नागपूरच्या दिशेने प्रवास करत होते. ही तिन्ही वाहने भरधाव वेगाने धावत असताना खाजगी बस चालकासमोर एक दुचारीस्वार आला होता. या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात होऊन बसल्याची घटना घडल्याची माहिती आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik Accident : चालकाला डुलकी लागली अन् घात झाला, एसटी बस थेट...मुंबई -आग्रा महामार्गांवर भीषण अपघात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल