TRENDING:

तरुणांचे ‘ब्रेनवॉशिंग’ करण्याचा कट उधळला, मध्यरात्रीपासून एटीएसची राज्यभर धडक कारवाई; दहशतवादी नेटवर्कला धक्का

Last Updated:

एटीएसच्या पथकाने पुसद शहरातील वसंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकल्याने मोठी खळबळ उडाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
यवतमाळ :  राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि पुसद येथे काल मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणावर गोपनीय पद्धतीने सर्च ऑपरेशन राबविले. या कारवाईत एकूण 14 ठिकाणी छापे टाकून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या अचानक झालेल्या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही संशयित व्यक्ती दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून स्थानिक तरुणांना कट्टरवादी विचारसरणीकडे वळवण्याचा आणि त्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य एटीएसने अत्यंत गोपनीयतेने ही कारवाई आखली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात माजी सिमी (SIMI) कार्यकर्त्यांशी संबंधित ठिकाणे आणि व्यक्तींचा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या सर्च ऑपरेशनला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

advertisement

कागदपत्रे, मोबाईल फोन तसेच इतर डिजिटल उपकरणे जप्त

एटीएसच्या पथकाने पुसद शहरातील वसंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या दरम्यान संशयितांकडून काही कागदपत्रे, मोबाईल फोन तसेच इतर डिजिटल उपकरणे जप्त करून त्यांची सखोल तपासणी करण्यात आली. या डिजिटल साधनांमधून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. याशिवाय उमरखेड परिसरातही काही ठिकाणी शोधमोहीम राबवून संशयित हालचालींचा मागोवा घेण्यात आला.

advertisement

उमरखेड परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

ही संपूर्ण कारवाई सुरू असताना पुसद आणि उमरखेड परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त फौजफाटा तैनात केला होता. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्कता बाळगण्यात आली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

advertisement

घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीला केला रामराम, काकडी शेतीने उजळले नशीब, 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा
सर्व पहा

दरम्यान, या कारवाईबाबत एटीएसकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली, तरी चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती समोर येणार असून, या प्रकरणातील पुढील घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तरुणांचे ‘ब्रेनवॉशिंग’ करण्याचा कट उधळला, मध्यरात्रीपासून एटीएसची राज्यभर धडक कारवाई; दहशतवादी नेटवर्कला धक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल