TRENDING:

Supriya Sule : 'अजितदादांचा तेरावा होत नाही तोपर्यंत...', सुप्रिया सुळेंनी घेतला मोठा निर्णय!

Last Updated:

Supriya Sule On Ajit Pawar : सुप्रिया सुळेंनी अजितदादांच्या सोबतचा एक फोटो त्यांनी आपल्या स्टेटसला ठेवला अन् आपलं दु:ख व्यक्त केलं. अशातच सुप्रिया सुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Supriya Sule On Ajit Pawar (जितेंद्र जाधव, प्रतिनिधी) : बारामतीत विमान दुर्घटनेमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पवार कुटूंबियांमध्ये दुखवटा पाळला जात असून राजकीय घडामोडींना देखील वेग येताना दिसतोय. एकीकडे रोहित पवार यांनी मौन बाळगलं असताना दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे या दररोज अजितदादांसोबतचे फोटो आपल्या स्टेटसला ठेवत आहेत. आज बाराव्या दिवशीही अजितदादांच्या सोबतचा एक फोटो त्यांनी आपल्या स्टेटसला ठेवला अन् आपलं दु:ख व्यक्त केलं. अशातच सुप्रिया सुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Supriya Sule On Ajit Pawar
Supriya Sule On Ajit Pawar
advertisement

अजितदादांचा तेरावा होत नाही तोपर्यंत...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा झालेला विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू. याचा धक्का खासदार सुप्रिया सुळे यांना बसला असून जोपर्यंत अजित दादांना जाऊन तेरा दिवस होत नाहीत तोपर्यंत प्रसिद्धी माध्यमांना मी कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देणार नाही. तेरा दिवस झाल्यानंतर मी प्रसिद्धी माध्यमांशी बोलेन, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

advertisement

विमान अपघाताची चौकशी

सीआयडीकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी केली जात आहे. अजित पवार यांच्या सचिवांचीही सीआयडीने चौकशी केली. तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात सुनेत्रा पवार यांनी सुत्र हातात घेतली आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांचे निधन झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी म्हणावा तसा प्रचार अजिबात केला नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लोकांचे आभार मानले.

advertisement

सुनेत्रा पवारांची पहिल्यांदाच पोस्ट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच पोस्ट केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत केल्याबद्दल सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार, असं सुनेत्रा पवार यांनी पोस्ट करत म्हटलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Supriya Sule : 'अजितदादांचा तेरावा होत नाही तोपर्यंत...', सुप्रिया सुळेंनी घेतला मोठा निर्णय!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल