महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि प्रशासकीय फेरबदलांचा भाग म्हणून या बदल्या करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. निवडणुकीच्या काळात करण्यात आलेल्या या बदल्यांमुळे राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात नुकत्याच नगर परिषद, नगर पंचायती निवडणुकांचे निकाल लागले. मागील आठवड्यापासून राज्यात महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे. तर, आजपासून रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी आजपासूनच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे आणि शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी, महानगरपालिका निवडणुकांमध्ये मात्र पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत.
advertisement
कोणत्या आयपीएस अधिकाऱ्याची झाली बदली?
पुणे पोलीस दलाचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती आता वर्धाचे पोलीस अधीक्षक, वर्धा म्हणून करण्यात आली आहे.
तर, वर्धाचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची बदली नागरी हक्क संरक्षण विभागात पोलीस अधीक्षक पदी करण्यात आली आहे.
