TRENDING:

Devendra Fadnavis : मोदी-शाहांचा आशिर्वाद, विधानसभा निवडणुकीत फडणवीसच भाजपचे किंग मेकर!

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास टाकत मोठा निर्णय घेतला आहे, त्यामुळे फडणवीसच भाजपच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे किंग मेकर ठरणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल झोरी, प्रतिनिधी
मोदी-शाहांचा आशिर्वाद, विधानसभा निवडणुकीत फडणवीसच भाजपचे किंग मेकर!
मोदी-शाहांचा आशिर्वाद, विधानसभा निवडणुकीत फडणवीसच भाजपचे किंग मेकर!
advertisement

मुंबई : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार, देवेंद्र फडणवीस भाजपाचे अध्यक्ष होणार, देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातून हटवणार, महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी जोडून घ्यायचं आणि देवेंद्र फडणवीस त्यामध्ये अडथळा ठरतात, म्हणून त्यांना दिल्लीला नेणार. अशा अनेक अफवा गेल्या काही महिन्यात माध्यमांमध्ये पसरलेल्या होत्या. अर्थात या अफवा आपोआप पसरत नसतात तर त्या पसरवल्या जातात. देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत अफवा कोण पसरवतो यावर नंतर कधीतरी पण त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास टाकत मोठा निर्णय घेतला आहे.

advertisement

मोदींचा निर्णय काय ?

भाजपाच्या केंद्रीय समितीची जी काही बैठक झाली त्यामध्ये महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचे सगळे अधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेले आहेत. जागा वाटपामध्ये महायुतीमध्ये किती जागा घ्यायच्या? किती जागा सोडायच्या? कोणत्या जागेवर कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यायचं? हे सगळे ठरवण्याचे अंतिम अधिकार हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या हितशत्रूंना लगावलेली ही चपराक म्हणावी लागेल. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, पियुष गोयल, आशिष शेलार, हे महाराष्ट्रातले भाजपाच्या मुख्य फळीतले सगळे नेते या बैठकीला उपस्थित होते आणि या सगळ्या नेत्यांच्यासमोर स्पष्टपणे सर्वोच्च अधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेले आहेत.

advertisement

हा निर्णय का घेतला?

देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात किंगमेकर करण्यात आलं आहे कारण लोकसभेला केंद्रीय पातळीवर महाराष्ट्रात उमेदवार निवडीचे जे काही निर्णय घेण्यात आले होते त्याचा मोठा फटका हा निकालानंतर बसल्याचं दिसून आलं आहे.

लोकसभेचं जागावाटप करताना अनेक ठिकाणी निर्णय केंद्रीय नेतृत्वावरून करण्यात आलेले होते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी सर्व्हे करण्यात आला होता. त्याचा आधार घेऊन अनेक ठिकाणी विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले आणि त्यांना बाजूच्या मतदारसंघांमध्ये तिकीट देण्यात आले याचा थेट फटका भाजपाला बसला आणि 23 जागांवरून भाजप 9 जागांवर आला. या निर्णय प्रक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना विशेष काही अधिकार देण्यात आले नव्हते आणि त्याचाच फटका आता बसल्याचं दिसून येत आहे.

advertisement

या निकालानंतर मोदी आणि शाहांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांकडून या पराभवाचे विश्लेषण करणारे अहवाल मागवले होते आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांनी फडणवीस यांना निर्णय न घेऊ दिल्यामुळे हा फटका बसल्याचं कारण दिलं. यातून शहाणं होत केंद्र नेतृत्वाने आता सगळे अधिकार हे देवेंद्र फडणवीस यांना बहाल केले आहेत.

देवेंद्र फडणवीसांचं ट्रॅक रेकॉर्ड काय?

2014 ते 2019 या काळामध्ये देवेंद्र फडणवीस एकहाती महाराष्ट्राचे नेतृत्व करत होते. या काळात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी भाजपाला जिंकून दिलेलं आहे. 2014 ला महाराष्ट्राने 122 जागा निवडून आणत भाजप हा ऐतिहासिक रित्या राज्यातल्या सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. 2019 ला भाजपाने 105 जागा जिंकून पुन्हा एकदा शंभरच्या वर जागा जिंकणारा एकमेव पक्ष ठरला. मधल्या काळात मुंबई महानगरपालिका असो पुणे महानगरपालिका असो किंवा नागपूर महानगरपालिका महाराष्ट्रातल्या प्रत्येक महत्त्वाच्या शहरात भाजपाने त्यांचा झेंडा रोवला होता.

advertisement

लोकसभेला देखील 2019 ला देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 23 जागा निवडून आणून दाखवल्या होत्या. याच काळात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. या सगळ्याचे निर्विवाद श्रेय फडणवीसांना जातं. 2024 ला मात्र देवेंद्र फडणवीस यांना निर्णय प्रक्रियेपासून थोडं दूर ठेवण्यात आलं आणि त्याचा फटका हा महाराष्ट्रात बसला.

शाह आणि मोदींचा भक्कम पाठिंबा

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयामुळे फडणवीसांना केंद्रातून फुल सपोर्ट असल्याचा पुन्हा एकदा दिसून आलेले आहे.

अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू असतो अशा बातम्या विरोधकांकडून कायम पेरल्या जातात. केंद्रीय नेतृत्वाचे पूर्ण आशीर्वाद असल्याने भविष्यात देखील केंद्रीय पातळीवरचं फडणवीसांचं राजकीय भविष्य उज्वल असणार आहे.

थोडक्यात काय तर फडणवीस हेच विधानसभा निवडणुकीत किंगमेकर असणार आहेत. शरद पवार यांना शिंगावर घेणाऱ्या महाराष्ट्रातला एकमेव नेता देवेंद्र फडणवीस अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या राजकारणातला चाणक्य कोण हे स्पष्ट होईल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : मोदी-शाहांचा आशिर्वाद, विधानसभा निवडणुकीत फडणवीसच भाजपचे किंग मेकर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल