TRENDING:

'विमानात अजितदादांसोबत PA का नव्हता?' राष्ट्रवादीच्या खासदाराला वेगळाच संशय, म्हणाला...

Last Updated:

अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? असा संशय व्यक्त केला होता. हवेतच विमानाचा स्फोट झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता खासदार सोनवणे यांनी पुन्हा एकदा मोठा संशय व्यक्त केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: २८ जानेवारी रोजी अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर या अपघाताबद्दल विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. हा अपघात नसून घातपात असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? असा संशय व्यक्त केला होता. हवेतच विमानाचा स्फोट झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता खासदार सोनवणे यांनी पुन्हा एकदा मोठा संशय व्यक्त केला आहे.
News18
News18
advertisement

ज्यावेळी विमान अपघात झाला, त्यावेळी विमानात अजित पवारांचा पीए का नव्हता असा सवाल बजरंग सोनवणे यांनी विचारला आहे. मी संशय व्यक्त केला आहे, आरोप केला नाही. हा सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे, पुरावे देण्यासारखा विषय नाही. मी फक्त संशय व्यक्त केला आहे. याची चौकशी व्हावी, असं मला वाटतं.. झालेल्या घटनेची पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी मी करत आहे. गृहमंत्री मुख्यमंत्री यांना मी भेटणार आहे. माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. दादांचा मृत्यू दुर्दैवी झाला आहे, याची चौकशी व्हावी असं मला वाटतं, असं बजरंग सोनवणे म्हणाले.

advertisement

विमानात अजित पवारांसोबत पीए का नव्हता? मी समोरासमोर जाऊन बोलणारा माणूस आहे. नेहमी सोबत असणारे पीए त्यादिवशी कुठे गेले होते? त्यादिवशी फक्त सुरक्षारक्षकच सोबत होते. मी फक्त संशय व्यक्त केलेला आहे. याबाबत मी संसदेत प्रश्न उपस्थित करणार आहे. मुख्यमंत्र्‍यांना देखील भेटणार आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी योग्य पद्धतीने केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मला त्यावर विश्वास आहे, असंही सोनवणे म्हणाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

देशाचं महाराष्ट्राचं नेतृत्व हरवलं आहे. तळागाळातील प्रत्येक प्रश्नाची उकल अजित पवारांना होती. दादा येतील आणि भेटतील असं सर्वांना वाटतं. हा प्रसंग अत्यंत दुःखाचा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलनीकरणासंदर्भात म्हणाले की, हा अधिकार पवारसाहेबांचा आहे. त्यांचा घरचा विषय आहे. ते एकत्रित निर्णय घेतील.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'विमानात अजितदादांसोबत PA का नव्हता?' राष्ट्रवादीच्या खासदाराला वेगळाच संशय, म्हणाला...
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल