TRENDING:

Aadhaar Card Update Alert: आधार कार्डवर कितीवेळा फोटो बदलता येतो, फ्रीमध्ये होतं की पैसे भरावे लागतात?

Last Updated:

Aadhaar Card Update Alert: तिथे तुम्हाला आधीच अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तुम्ही केंद्रात आल्यावर तुम्हाला स्वतःचा एक नवीन फोटो घेण्यास सांगितले जाईल.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई : भारतात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत काही महत्त्वाची कागदपत्र तुम्हाला कायम सोबत ठेवावे लागता. ही कागदपत्र आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी द्यावी लागतात. त्यापैकीच एक म्हणजे आधार कार्ड, याचा सर्वाधिक वापर केला जातो. 90% पेक्षा जास्त भारतीय लोकांकडे हे आहे. अनेक सरकारी सेवा आणि योजनांसाठी ते अनिवार्य आहे. कधी कधी आधार कार्ड बनवताना किंवा अपडेट करताना काही माहिती चुकीची ठरते. यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करण्याची तारीख 14 जून दिली आहे. त्यानंतर मात्र कोणतीही मुदतवाढ होणार नाही असं सांगण्यात आलं आहे. आधार कार्डवर फोटो अपडेट करण्याचा नियम काय आहे, कितीवेळा तो अपडेट करता येतो जाणून घेऊया.

advertisement

चांगली गोष्ट म्हणजे आधार कार्डमध्ये काही चूक असेल तर तुम्ही ती दुरुस्त करू शकता. UIDAI युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, भारत सरकारच्या अंतर्गत काम करणारी संस्था, आधार कार्डमध्ये बदल करण्याची सुविधा प्रदान करते. मग ते नाव, पत्ता, मोबाईल नंबर किंवा तुमचा फोटो असो. तुम्ही तुमची माहिती सहज अपडेट करू शकता. पण एक प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात निर्माण होतो.

advertisement

 पुन्हा वाढणार नाही मुदत! ही शेवटची संधी, आधार कार्ड फ्रीमध्ये कधीपर्यंत अपडेट करता येणार?

आपण आपला फोटो किती वेळा बदलू शकतो? सर्वप्रथम, हे जाणून घेऊया, की तुम्ही नाव, पत्ता आणि नंबर यासारखी आधार कार्ड माहिती तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा अपडेट करू शकता, फोटोच्या बाबतीत कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही तुमचा फोटो तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा बदलू शकता. प्रत्येक वेळी यासाठी तुम्हाला नवीन शुल्क भरावे लागेल. आधार कार्डमध्ये तुमचा फोटो बदलायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल. तिथे तुम्हाला आधीच अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तुम्ही केंद्रात आल्यावर तुम्हाला स्वतःचा एक नवीन फोटो घेण्यास सांगितले जाईल. त्यानंतर तुमची माहिती अपडेट होईल आणि तुमचे नवीन आधार कार्ड काही दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचेल.

advertisement

केवळ फोटोच नाही तर तुमचा पत्ता, मोबाईल नंबर आणि इतर माहितीही तुम्ही कधीही अपडेट करू शकता. या गोष्टी अपडेट करण्यासाठी UIDAI ने कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. जेव्हा जेव्हा तुमच्या माहितीत काही बदल होतो तेव्हा तुम्ही ती सहज अपडेट करू शकता. आधार कार्डमधील कोणत्याही बदलासाठी, तुम्हाला UIDAI वेबसाइट किंवा जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. तुम्ही काही बदल ऑनलाइन देखील करू शकता, जसे की मोबाईल नंबर आणि पत्ता अपडेट करणे, परंतु फोटोसाठी तुम्हाला फक्त आधार केंद्रावर जावे लागेल.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Aadhaar Card Update Alert: आधार कार्डवर कितीवेळा फोटो बदलता येतो, फ्रीमध्ये होतं की पैसे भरावे लागतात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल