TRENDING:

Atal Pension Yojana: घरबसल्या अटल पेन्शन योजनेसाठी खातं कसं उघडायचं?

Last Updated:

अटल पेन्शन योजना असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी केंद्र सरकारची योजना आहे. यात मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक हप्त्याने गुंतवणूक करून निवृत्तीनंतर पेन्शन मिळते.

advertisement
मुंबई: व्यवसाय असो किंवा नोकरी आजकाल नव्या तरुण पिढीसाठी पेन्शनची सोय प्रत्येकाला स्वत:ची स्वत: करावी लागणार आहे. जर तुम्ही स्वत: जर आतापासून तो सोय केली तर भविष्यात तुम्हाला त्रास कमी पडू शकतो. त्यामुळे तुम्ही आतापासून पैसे साठवायला सुरुवात करा. अटल पेन्शन योजना हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला किती महिन्याला पेन्शन हवं यावर किती रक्कम भरायचे आणि किती वर्षांसाठी भरायची हे अवलंबून असतं.
News18
News18
advertisement

अटल पेन्शन योजनेत तुम्हाला ठरलेली मासिक पेन्शन मिळते, जी तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या वेळी निवडू शकता. पेन्शनची रक्कम 1,000, 2,000,3,000, 4,000 किंवा 5,000 रुपये प्रति महिना असू शकते.तुम्ही निवडलेली पेन्शनची रक्कम आणि तुमचे वय यानुसार तुम्हाला योजनेत नियमित हप्ता भरावा लागतो. हा हप्ता मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक असू शकतो.

अटल पेंशन योजनाव ही असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी आणि ज्यांना निवृत्तीनंतर नियमित पेन्शनची गरज आहे, त्यांच्यासाठी केंद्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही वयाच्या 60 वर्षानंतर निश्चित पेन्शन मिळवू शकता. अटल पेंशन योजनेत खाते उघडण्यासाठी अनेक सोप्या पद्धती उपलब्ध आहेत. त्यापैकी तीन प्रमुख पद्धती खालीलप्रमाणे आहेत:

advertisement

ऑनलाईन खातं कसं उघडायचं?

आजकाल बहुतेक लोकांकडे नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करून तुम्ही घरी बसल्या सहजपणे अटल पेंशन योजनेत खाते उघडू शकता.

सर्वप्रथम तुमच्या बँकेच्या नेट बँकिंगमध्ये लॉग-इन करा.

लॉग-इन केल्यानंतर 'APY' किंवा 'अटल पेंशन योजना' असा पर्याय शोधा. Investments किंवा Social Security Schemes असा पर्याय तुम्हाला दिसेल तिथे क्लिक करा

advertisement

APY चा पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज दिसेल.

या अर्जामध्ये तुमची आवश्यक वैयक्तिक माहिती अचूकपणे भरा.

त्यानंतर नॉमिनीची Nominee म्हणजेच वारसदाराची माहिती भरा.

फॉर्म सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून ऑटो डेबिटसाठी Auto Debit म्हणजेच आपोआप पैसे जमा होण्यासाठी मंजुरी द्यावी लागेल.

तुम्ही निवडलेल्या हप्त्यानुसार (मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक) तुमच्या खात्यातून पैसे आपोआप जमा होतील.

advertisement

मंजुरी दिल्यानंतर तुमचा अर्ज सादर होईल आणि तुमच्या APY खात्याची प्रक्रिया सुरू होईल.

नेट बँकिंग नसेल तरी उघडता येणार खातं?

ज्यांच्याकडे नेट बँकिंगची सुविधा नाही, ते नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या (National Pension System - NSDL) वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने APY खाते उघडू शकतात. त्यासाठी तुम्ही या सोप्या गोष्टी करून पाहा.

enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem अटल पेन्शन योजनेच्या या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

advertisement

वेबसाइटवर 'Atal Pension Yojana' टॅब शोधा आणि त्यावर क्लिक करा.

त्यानंतर 'APY Registration' या पर्यायावर क्लिक करा.

'New Registration' चा फॉर्म तुमच्यासमोर उघडेल. यामध्ये तुमची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा आणि 'Continue' वर क्लिक करा.

फॉर्म भरल्यानंतर 'Complete Pending Registration' मध्ये तुमची उर्वरित माहिती भरा.

आता तुम्हाला 'KYC' प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यासाठी खालील तीनपैकी कोणताही एक मार्ग निवडू शकता

KYC पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक 'Acknowledgement Number' मिळेल. हा नंबर जपून ठेवा.

यानंतर तुम्हाला वयाच्या ६० वर्षानंतर किती पेन्शन हवी आहे, तो पर्याय निवडा. तुमच्या गुंतवणुकीनुसार आणि निवडलेल्या पेन्शननुसार तुमच्या हप्त्याची रक्कम निश्चित होईल.

तुम्हाला हप्ता कसा भरायचा आहे - मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक - हे देखील येथे नमूद करा.

आता नॉमिनीचा फॉर्म व्यवस्थित भरा. नॉमिनीची अचूक माहिती देणे आवश्यक आहे.

हे सर्व झाल्यावर तुम्ही NSDL च्या वेबसाइटवरील 'eSign' टॅबवर पोहोचाल.

तुमच्या आधार कार्डावर (Aadhaar Card) नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरवर एक 'OTP' (One-Time Password) येईल. तो OTP टाकून व्हेरिफाय करा.

आधार OTP यशस्वीरित्या व्हेरिफाय झाल्यावर तुम्ही अटल पेंशन योजनेत सहभागी व्हाल.

ऑफलाइन प्रक्रियेद्वारे (Offline Process):

ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया किचकट वाटते किंवा ज्यांना बँकेत जाऊन खाते उघडायला सोपे वाटते, त्यांच्यासाठी ऑफलाइन पद्धत उपलब्ध आहे.

जर तुमचे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल, तर तुम्ही थेट तुमच्या जवळच्या शाखेत (Branch) जाऊ शकता.

तेथे जाऊन 'अटल पेंशन योजना नोंदणी अर्ज' (APY Registration Form) मागा.

अर्ज मिळाल्यानंतर तो काळजीपूर्वक भरा आणि बँकेतील किंवा पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांकडे जमा करा.

तुमच्या अर्जाची पडताळणी झाल्यावर आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचे APY खाते उघडले जाईल.

मराठी बातम्या/मनी/
Atal Pension Yojana: घरबसल्या अटल पेन्शन योजनेसाठी खातं कसं उघडायचं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल