कोणत्या राज्यात बँकांना सुट्टी?
देशभरातील सर्व बँका दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवार आणि रविवारी बंद राहतात. तसेच, अनेक राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी बँका बंद राहतात आणि कोणतेही काम नसते. मकर संक्रांती आणि पोंगल निमित्त देशभरातील सर्व बँकांना सुट्टी राहणार नाही. हो, काही राज्यांमध्ये नक्कीच सुट्टी असेल. या काळात बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.
advertisement
महाराष्ट्रात सुट्टी असणार की नाही?
मकर संक्रांती आणि पोंगल निमित्ताने अनेक राज्यांमध्ये बँक आणि सरकारी कार्यालयं बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्ही सरकारी कार्यालयात कामासाठी जाणार असाल तर ते बंद आहे की नाही याची आधी चौकशी करा. अहमदाबाद, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, तेलंगाना, ईटानगर, कानपूर आणि लखनऊ या शहरांमध्ये मकर संक्रांतीनिमित्ताने बँका बंद राहणार आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात मकर संक्रांतीनिमित्ताने सुट्टी नसेल.
जानेवारी महिन्यात किती दिवस राहणार बँक बंद?
जानेवारी महिन्यात शनिवार रविवार पकडून 13 दिवस सुट्ट्या होत्या. वेगवेगळ्या राज्यांमध्ये या सुट्ट्या होत्या, आसबीआयने सुट्ट्यांची यादी जाहीर केली होती. तुम्ही घरातून निघण्याआधी सुट्ट्यांची यादी पाहून त्यानुसारच तुमचं बँकेतल्या कामांचं नियोजन करा.
ऑनलाईन बँकिंग सुविधा राहणार सुरू
14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीनिमित्ताने ज्या शहरांमधील बँका बंद राहणार आहेत त्या त्या शहरात ऑनलाईन सेवा सुरू असल्याने तुमची छोटी कामं होऊ शकतात. ऑनलाईन बँकिंग, UPI पेमेंटद्वारे तुम्ही तुमची कामं पूर्ण करू शकता. ATM मध्ये मात्र खडखडाट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच कॅश काढून तुमच्या जवळ ठेवा नाहीतर अडचणी निर्माण होऊ शकतात. ऑनलाईन बँकिंग सेवा सातही दिवस 24 तास सुरू असते.