TRENDING:

Mediclaim आणि Health Insurance मध्ये फरक काय? माहिती नसेल तर घ्या जाणून

Last Updated:

तुम्ही मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स हे एकच मानत असाल तर हा गोंधळ तुमच्या मनातून काढून टाका. कारण दोघांमध्ये खूप फरक आहे. त्याबद्दल जाणून घ्या.

advertisement
मुंबई : आजच्या काळात लोक त्यांच्या आरोग्याबाबत खूप सतर्क झाले आहेत. कारण आता लोक आरोग्य विमा इत्यादी आधीच खरेदी करुन ठेवतात जेणेकरून कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती सहजपणे हाताळता येईल. परंतु आरोग्य विम्याबाबत अजूनही अनेक लोकांमध्ये गोंधळ आहे. म्हणजेच, बरेच लोक आरोग्य विमा आणि मेडिक्लेम एकच मानतात आणि या गोंधळामुळे ते आरोग्य विम्याऐवजी मेडिक्लेम खरेदी करतात. तुम्हीही हीच चूक करत असाल तर आजच ही चूक दुरुस्त करा आणि त्यातील फरक जाणून घ्या.
मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्समध्ये फरक काय?
मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्समध्ये फरक काय?
advertisement

हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय?

आरोग्य विमा तुम्हाला व्यापक कव्हर प्रदान करतो. यामध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च, डेकेअर, ओपीडी खर्च इत्यादींचा देखील समावेश आहे. पॉलिसीनुसार कंपनी हा संपूर्ण खर्च उचलते. आरोग्य विम्यामध्ये, तुम्हाला गंभीर आजार, प्रसूती लाभ आणि इन्‍फर्टिलिटी कव्हर असे अनेक प्रकारचे अतिरिक्त कव्हर मिळू शकतात. वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया दोन्ही उपचार विम्याअंतर्गत समाविष्ट आहेत. आरोग्य विमा योजना फ्लेक्सिबिलिटी देतात आणि पर्सनल गरजांनुसार त्या व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात. आरोग्य विम्यातही कॅशलेस उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. काही विमा कंपन्या आरोग्य विम्यात वैद्यकीय तपासणीचाही समावेश करतात.

advertisement

Wife सोबत मिळून करा गुंतवणूक! दरमहा मिळेल 9250चं फिक्स व्याज, स्किम काय?

मेडिक्लेम म्हणजे काय?

मेडिक्लेम ही एक विमा पॉलिसी आहे. ज्यामध्ये तुम्हाला रुग्णालयात दाखल झाल्यावरच कव्हर मिळते. यामध्ये, तुम्हाला अतिरिक्त कव्हर अॅड-ऑन मिळण्याची सुविधा मिळत नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये, रुग्णालयात दाखल करण्याचा कमाल खर्च 5 लाख रुपयांपर्यंत असतो. तसंच, जास्तीत जास्त कव्हर विमा प्रदात्यावर अवलंबून असेल. आरोग्य विम्याच्या तुलनेत यामध्ये फ्लेक्सिबिलिटी देखील कमी आहे. तुमच्याकडे मेडिक्लेम असेल, तर तुम्ही खर्च भरण्यासाठी तुमचे बिल विमा कंपनीकडे सादर करू शकता किंवा मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कॅशलेस ऑप्शन निवडू शकता.

advertisement

Mutual fund मध्ये बंपर रिटर्न मिळवायचंय? मग या 5 गोष्टी नेहमी ठेवा लक्षात

मेडिक्लेम की हेल्थ इन्शुरन्स, काय निवडावे?

मेडिक्लेमचे कव्हरेज कमी असल्याने, ते हेल्थ इन्शुरन्सपेक्षा स्वस्त आहे. परंतु तज्ञांच्या मते, आपण व्यापक आरोग्य विमा निवडला पाहिजे. आरोग्य विमा घेताना, विविध कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या कव्हरेज, सर्व्हिसेस, फायदे आणि प्रीमियमची तुलना करणे खूप महत्वाचे आहे. पर्सनल विम्याच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात, म्हणून तुम्ही तुमच्या बजेट आणि गरजांना अनुरूप असा इन्शुरन्स प्लॅन खरेदी करावा.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Mediclaim आणि Health Insurance मध्ये फरक काय? माहिती नसेल तर घ्या जाणून
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल