आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव सध्या ४,५९१.५२ डॉलर प्रति औंस इतका प्रचंड वाढला आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेले युद्धजन्य वातावरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण यामुळे सोन्याचे दर वधारले आहेत. तसेच, भारत सरकारने सोन्याच्या आयातीवर (Import) आणलेल्या नवीन निर्बंधांमुळे देशांतर्गत पुरवठा कमी झाला असून, त्याचा थेट परिणाम किमतींवर दिसून येत आहे.
advertisement
सोन्याचे दर दीड लाखाच्या पार गेल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. विशेषतः ज्यांच्या घरात येत्या काही महिन्यांत लग्नकार्य आहे, त्यांना आता दागिन्यांसाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापेक्षा अजून सोन्या चांदीच्या किंमती खाली येतील याची शक्यताच कमी आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेपर्यंत पुन्हा दरवाढ पाहायला मिळू शकते.
| शहर | २४ कॅरेट | २२ कॅरेट |
| दिल्ली | १,५१,०९० | १,३८,५१० |
| मुंबई | १,५०,९४० | १,३८,३६० |
| पुणे | १,५०,९४० | १,३८,३६० |
| चेन्नई | १,५१,१०० | १,३८,५१० |
| बेंगळुरू | १,५०,९४० | १,३८,३६० |
| कोलकाता | १,५०,९४० | १,३८,३६० |
चांदीचे दर पुन्हा वाढणार का?
चांदीमध्ये पुन्हा एकदा तेजी येईल, असे मानणाऱ्या वर्गाकडे काही ठोस कारणं आहेत. जर मध्यपूर्वेतील तणाव कमी झाला, तर जागतिक बाजारपेठेत डॉलर कमकुवत होईल. ऐतिहासिकदृष्ट्या जेव्हा जेव्हा डॉलर स्वस्त होतो, तेव्हा चांदी आणि सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होते.
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह २०२६ मध्ये व्याजदरात कपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कमी व्याजदर हे नेहमीच मौल्यवान धातूंसाठी बूस्टर ठरतात. चांदी ही केवळ दागिन्यांसाठी वापरली जाणारी धातू नाही. इलेक्ट्रिक वाहने (EV), सोलर पॅनेल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील उपकरणांमध्ये चांदीचा वापर अनिवार्य आहे. ही मागणी भविष्यात चांदीला सावरू शकते.
