बल्गेरियन बाबा वेंगा यांचंही भाकित समोर आले आहे.
>> जागतिक अस्थिरतेमुळे सोन्याची मागणी वाढली
तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक अनिश्चितता, वाढती महागाई आणि व्यापार तणाव यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे अनेकांचा ओढा वाढला आहे. अनेक देशांमध्ये स्थिर व्याजदर आणि मंदीच्या भीतीमुळे सोन्याच्या दराला चांगलीच झळाळी मिळाली आहे.
>> बाबा वेंगांची भविष्यवाणी आणि २०२६ चे संकट
advertisement
काही वृत्तांनुसार, बाबा वेंगा यांनी २०२६ मध्ये जागतिक पातळीवर आर्थिक संकटाची शंका व्यक्त केली. बाबा वेंगा यांनी २०२६ मध्ये जागतिक आर्थिक संकट किंवा "कॅश-क्रश" होण्याची शक्यता वर्तवली होती. अशा परिस्थितीत, पारंपारिक बँकिंग प्रणालीवर परिणाम होऊ शकतो आणि सोन्याच्या किमती २५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. जर असे झाले तर भारतातील सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १ लाख ६२ हजार रुपये ते १ लाख ८२ हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. हा दर आतापर्यंतचा मोठा उच्चांक आहे.
>> गुंतवणूकदारांसाठी कोणते संकेत?
गुंतवणूकदारांसाठी सावधगिरी बाळगण्याची आणि धोरण आखण्याची ही वेळ आहे. आर्थिक संकटाच्या काळात सोने नेहमीच सुरक्षितत मानले गेले आहे, परंतु केवळ अंदाजांवर अवलंबून राहणे धोकादायक असू शकते. तज्ज्ञांनी सांगितले की, महागाई, व्याजदर आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन गुंतवणूकीचे निर्णय घेतले पाहिजेत. भविष्यात सोन्याची चमक आणखी वाढू शकते, परंतु विचाराने केलेली गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरू शकेल.
(Disclaimer: ही बातमी फक्त माहितीसाठी असून कोणताही गुंतवणुकीविषयक सल्ला नाही. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी, गुंतवणूक तज्ज्ञ, आर्थिक सल्लागार यांचा सल्ला घ्यावा.)
