CIBIL स्कोअर म्हणजे काय?
खरं तर CIBIL स्कोअर हा तुमच्या क्रेडिटचा रिपोर्ट असतो जो क्रेडिट हिस्ट्री सांगतो. हा स्कोअर सांगतो की, तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा कर्जाचे पेमेंट वेळेवर केले आहे की नाही आणि तुम्ही वेळेवर व्याज भरले आहे की नाही.
एक लिटर पेट्रोल-डिझेलवर पंप मालकाला किती कमीशन मिळतं? जाणून व्हाल चकीत
advertisement
CIBIL स्कोअर कसा बनवला जातो?
स्कोअरचा 30% भाग हा पेमेंट हिस्ट्री म्हणजेच वेळेवर किती पेमेंट केले गेले आहेत याचा असतो. 25% हा क्रेडिट एक्सपोजरचा वेटेज असतो ज्यामध्ये तुम्ही किती कर्ज घेतले आहे याची माहिती असते. 25% हा क्रेडिटचा प्रकार आणि वेळ असतो. याशिवाय, उर्वरित 20% इतर घटकांवर अवलंबून असते. लक्षात ठेवा की CIBIL स्कोअरची श्रेणी 300-900 दरम्यान आहे. स्कोअर वाईट, चांगला आणि उत्कृष्ट मध्ये मोजला जातो. CIBIL स्कोअर जितका चांगला असेल तितके चांगले रेटिंग असेल. या CIBIL स्कोअरच्या आधारे बँक तुम्हाला कर्ज देईल.
Paytm वर कसे तपासायचे
CIBIL स्कोअर पाहण्यासाठी Paytm अॅप उघडा.
तुम्हाला होम पेजवर मोफत टूल्सचा पर्याय मिळेल, त्यात Check your latest credit score वर टॅप करा.
तुम्ही तुमचे नाव टाकून स्कोअर तपासू शकता.
टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करताय? आधी वाचा या 5 गोष्टी, अन्यथा होईल पाश्चाताप
Google Pay वर डिटेल्स शोधा
सर्वप्रथम तुमच्या फोनवर गुगल पे अॅप उघडा आणि खाली स्क्रोल करा.
आता तुम्हाला Check your cibil score for free असा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.
यानंतर, तुम्ही चेक स्कोर वर टॅप करून तुमचा सिबिल स्कोअर तपासू शकता.
अशा प्रकारे तुम्हाला PhonePe वर ऑप्शन मिळेल
तुमचा सिबिल स्कोअर तपासण्यासाठी फोनपे अॅप उघडा.
यानंतर, तुमच्याकडे होम पेजवर लोन्सचा ऑप्शन असेल, हा ऑप्शन रिचार्ज आणि बिल अंतर्गत आढळेल. आता तुम्हाला चेक क्रेडिट स्कोअरवर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला काही डिटेल्स जोडण्याची परमिशन मागितली जाईल आणि तुमचा सिबिल स्कोअर दिसेल.
