TRENDING:

Ladki Bahin Yojana: 2100 मिळणार की गुलिगत धोका? पुढच्या हप्ताला समजणार, लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट्स

Last Updated:

Ladki Bahin Yojana Latest Updates: जर निकषांची पूर्तता तुम्ही केली नसेल किंवा नियम मोडले असतील तर तुम्ही या लाभार्थ्यांमधून बाद होणार आहात.

advertisement
मुंबई: लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळत आहेत. नुकताच सहावा हप्ता देण्यात आला. आता या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीणचे लाभ घेणाऱ्यांची स्क्रूटीनी होणार आहे. ज्यांची तक्रार आली आहे अथवा जे आता पात्रतेत बसत नाहीत त्यांचे अर्ज आणि कागदपत्र या योजनेतून बाद केली जाणार आहेत.
Ladki Bahin Yojana: 2100 मिळणार की गुलिगत धोका? पुढच्या हप्ताला समजणार, लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट्स
Ladki Bahin Yojana: 2100 मिळणार की गुलिगत धोका? पुढच्या हप्ताला समजणार, लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट्स
advertisement

तुम्ही या अर्जाचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. जर निकषांची पूर्तता तुम्ही केली नसेल किंवा नियम मोडले असतील तर तुम्ही या लाभार्थ्यांमधून बाद होणार आहात. आधीच 64 लाख अर्जांची छाननी सुरू आहे. याशिवाय ज्या महिलांचे आधार बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही त्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला नाही.

advertisement

काय आहे लाडकी बहीण योजनेची पात्रता

  • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  • राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  • किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • advertisement

या महिला ठरणार अपात्र

  • सरसकट स्क्रीटिनी होणार नाही
  • उत्पन्नात वाढ झाली असेल ती लाभार्थी म्हणून पात्र नाही
  • दुचाकीच्या वर चारचाकी असेल तर पात्र नाही
  • आधार आणि बँक नावात तफावत असेल तर ते पात्र नाहीत
  • ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • या चारचाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आलं आहे.
  • advertisement

  • ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ येथून पुढे मिळणार नाहीये.
  • ज्या महिला किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील.
  • तसंच मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत असतील.
  • advertisement

  • सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार आहे.
  • ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana: कुणाला पैसे मिळणार कुणाला नाही? निकष काय, कुणाला वगळणार? आदिती तटकरेंनी सगळं सांगितलं

मराठी बातम्या/मनी/
Ladki Bahin Yojana: 2100 मिळणार की गुलिगत धोका? पुढच्या हप्ताला समजणार, लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल